प्राणी मित्र कुमार देशपांडे यांनी दिले अपघातग्रस्त गाईला जीवदान,

रोहा कोलाड महामार्गावर अज्ञात वाहनांनी धडक दिलेल्या गाईवर केले उपचार दिले जीवदान,

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा कोलाड राज्य महामार्गावर धाटाव स्टॉप नजीक गाईला एका आज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती गंभीर जखमी होत तिच्या पुढील पायांना मोठी दुखापत झाली तद्नंतर अनेकजनांचा घोळका झाला परंतु मालकाचा पत्ताच लागला नाही त्यामुळे जखमी झालेल्या गाईकडे पाहत अनेकांच्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहत होते उपचार करणारे डॉक्टरांचा तपास कुठे लागेल या चिंतेत सारेजण पडले मात्र गर्भ धारण केलेली ही गो माता जखमी झालेल्या गाईला गंभीरपणे जखम झाल्याने तिला खूप वेदना जाणवत असल्याने ती अक्षरशः लोळपटे खात होती येथील दीपक नेट्राइट कारखान्यातील ट्रक चालक व किन्नर तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत भोकटे गांगल आदी नागरिकांनी तिला बाजूला घेत पाणी पाजले.

येथील जमलेल्या नागरिकांनी रोहा पशु वैद्यकीय अधिकारी यांना अनेकदा उपस्थित नागरिकांनी त्यांच्या मोबाईल वरून संपर्क साधला मात्र एकही कॉल संबधित अधिकारी वर्गाने उचलले नसल्याने अधिक उपस्थित नागरिकांची धाकधूक वाढली व तद्नंतर रोहा शहरातील सर्वांच्या मदतीस धावून येणारे प्राणी मित्र कुमार देशपांडे यांचा संपर्क नंबर मिळताच त्यांना त्याचक्षणी देशपांडे यांना संपर्क साधला असता ते स्व खर्चाने औषोधोपचार घेऊन तातकाल घटनास्थळी हजर झाले आणि ते येताक्षणीच उपचार सुरू करताच उपस्थित नागरिकांची धाकधूक कमी झाली.

रोहा कोलाड मार्गावर धाटाव स्टॉप नजीक ही घटना सकाळी  9:30 वाजताच्या सुमारास घडली परिसरातील गुरे चरण्यासाठी मोकाट सोडल्याने हा आपघात घडला असून एका अज्ञात वाहनांच्या धडकेने ही गाय गंभीर जखमी झाली होती तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदरच्या जखमी गाईवर ताबडतोब प्राणी मित्र कुमार देशपांडे यांनी इंजेक्शन, सलाईन तसेच तिचे पुढील पाय फॅक्चर झाले असल्याने जवळपास दोनतासांहून अधिक काळ आपला अमूल्य वेळ देत जखमी गाईवर उपचार करत तिला ठणठणीत बरे करत पुन्हा उभी केली गर्भ धारण केलेल्या या गो माता गाईला पुन्हा जीवदान मिळाल्याने बरे वाटले व त्यामुळे उपस्थित नागरिकांनी देशपांडे यांचे खूप कौतुक करत अभिनंदन करत त्यांना धन्यवाद दिले.

प्रतिक्रिया:-

या परिसरात अनेक गुरांचे मालक हे आपली गुरे मोकाट सोडत  आहेत त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही ही गुरे कायमस्वरूपी एम आय डी सी हद्दीत वावरत असतात तर रोहा कोलाड मार्गवरून ये जा करत असतात अथवा थांड मांडून उभे राहतात परंतू या मार्गावर सातत्याने जड अवजड वहनांची वाहतूक देखील सुरू असते सकाळी एका अज्ञात वाहनाने सदरच्या गाईला धडक दिल्याने ती खुप गंभीर झाली होती परंतु दैव बलवत्तर म्हणून देवरूपी ताबतोब प्राणी मित्र देशपांडे साहेब यांना संपर्क साधताच ते आले आणि उपचार केले मात्र शासकीय सेवेत असलेले पशु वैद्यकीय अधिकारी यांना देखील संपर्क साधला मात्र त्यांना साधे कॉल उचलण्याएवढे वेळ नसल्याची खंत व्यक्त केली .यशवंत भोकटे सामाजिक कार्यकर्ते धाटाव.

Comments

Popular posts from this blog