रेल्वे प्रवासी संघ,मनसे च्या पाठपुराव्याला रोहेकरांची साथ, रोहा दिवा मेमुची वाढीव फेरी लवकरच सेवेत
रोहे(श्याम लोखंडे)रोहे दिवा मेमु सेवा वाढवत लांबपल्याच्या गाड्यांचे रद्द केलेले थांबे पूर्ववत करावे यासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत होते.यासंबंधी वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनास निवेदने दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती.रोह्या मधून रेल्वे सेवा वाढावी ही प्रत्येक सर्वसामान्य रोहेकराची मनोमन इच्छा होती. त्यामुळे यासाठी होणाऱ्या प्रत्येक कृतीला रोहेकरानी भरभक्कम साथ दिली. याला आता यश येताना दिसत आहे.मनसेने यासाठी राबविलेल्या सह्यांच्या मोहिमेचे निवेदन मध्य रेल्वे चे अप्पर विभागीय व्यवस्थापक (वाहतूक) एच जी तिवारी यांना दिल्यानंतर ६ ऑक्टोंबर रोजी यासंबंधी प्रस्थाव दाखल केला. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वे ने रोहे दिवा मार्गावर नवीन मेमु फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.यामुळे आता लवकरच रोहेकरांसाठी सकाळी सव्वापाच नंतर अजून एक वाढीव फेरी उपलब्ध होणार असल्याचे या जाहीर केलेल्या पत्रावरून दिसत आहे.
कोरोना मुळे दोन वर्षे विस्कळीत व रोहेकरांसाठी गैरसोयीचे असणारे वेळापत्रक पुर्वपदावर यावे यासाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ अंतर्गत रोहे रेल्वे प्रवासी संघ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत होते. यासाठी वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निवेदने देण्यात येत होती.अपुरी रेल्वे सेवा असल्यामुळे नोकरदार,व्यावसायिक व विद्यार्थी यांसह अन्य सर्वसामान्य प्रवाश्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुर्यकांता वाघमारे,पुरुषोत्तम देशमुख,के. के.मोहन रामनरेश कुशवाह , महादेव सरसंबे,महेंद्र मोरे आदी पत्रकारांनी वेळोवेळी ह्या संदर्भात यांनीही मोलाचे सहकार्य केले , रोहे मधील रेल्वे सेवेच्या संबंधीत भेडसावणाऱ्या सर्व समस्यांच्या बाबत मध्य रेल्वे प्रशासनास निवेदने देत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत होता. मनसेचे रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांचे मार्गदर्शनाखाली रोहेकरांच्या मागण्या रेल्वे प्रशासना पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वप्रथम सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. ही मोहीम तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, उपतालुकाध्यक्ष सुरज मुटके,धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, शहराध्यक्ष मंगेश रावकर, उपाध्यक्ष अमित पवार , महेश साळुंखे व सर्व मनसैनीकांनी यशस्वी करत हजारो रोहेकरांच्या सह्या घेतल्या. यानंतर हे हजारो सह्यांचे निवेदन मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयाला देण्यात आले. त्यावेळी रोहे मध्ये मेमु सेवा वाढत जलद गाड्या थांबल्या तर त्या प्रवाश्यांना फायदेशीर ठरत यामुळे रोहे शहराचे अर्थकारण कसे बदलेल ही भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली. याची दखल रोहा वरुन दिव्यासाठी सुरु होणाऱ्या नवीन मेमु सेवेच्या वेळापत्रकाचे पत्र मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. यानुसार सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी रोहा वरुन सुटेल तर दिव्या वरुन सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल व रोहा मध्ये रात्री ९ वाजून १० मिनिटांनी दाखल होणार आहे. आता फक्त हे वेळापत्रक जाहीर केले असून लवकरच ही मेमु सेवा रोहेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे रोहेकरांचा रेल्वे प्रवास सुखकर होत बाजारातील अर्थकारणावर ही चांगला परिणाम होणार आहे.
अमोल पेणकर :- मनसे, जिल्हा सचिव, सर्व रोहेकरांनी दिलेल्या साथीमुळे हे यश मिळाले आहे. मात्र या यशाने मनसे हुरळुन जाणार नाही. मेमु सेवेसह जलद गाड्यांचे रद्द केलेले थांबे पुर्ववत करत अधिक जलद गाड्या थांबण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवत वेळ पडल्यास आंदोलन ही करणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment