इंदिरा येलकर यांचे दुःखद निधन

कै. इंदिरा येलकर 

  खांब/पुगांव(नंदू कळमकर)रोहा तालुक्यातील पुगांव गावच्या रहिवासी इंदिरा(धोंडी आका)काशिराम येलकर यांचे सोमवार दि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षांचे होते.त्या प्रेमळ व शांत स्वभावाने सर्वाना परिचित होत्या. त्यांचे माहेर व सासर गावातच असल्यामुळे त्यांना सर्वजन धोंडी आका या नावाने हाक मारीत असत.

      त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसहित समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी नारायण धनवी व घनश्याम बागुल यांनी दुःख व्यक्त करतांना सांगितले. धोंडी आका ही अतिशय प्रेमळ होती परंतु त्यांच्या एकुलत्या एक मुलांचे तरुणपणी  निधन झाले असतांना त्यांची सून सारिका हिने दोन लहान मुलांसह सासूची आपल्या आई प्रमाणे शेवट पर्यंत सेवा केली व समाजपुढे एक आदर्श ठेवला त्याच प्रमाणे त्यांच्या मुलींनी ही आईची सेवा केली. त्यांच्या पश्चात सून, दोन नातवंडे,एक मुलगी,जावईपुतणे,मोठा येलकर परिवार आहे.त्यांचे   दशक्रिया विधी बुधवार दि.१६ नोव्हेंबर तर उत्तरकार्यविधी शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog