जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे:- सुरेश मगर

खांब (नंदकुमार कळमकर )ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात झंझावात सुरू आहे.आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर,माजी आ.दशरथदादा पाटील, जे.डी. तांडेल यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचे काम चालु आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण कायमस्वरूपी टिकले पाहीजेत हे आरक्षण टिकले तरच भविष्यात ओबीसींच्या शहरासह ग्रामीण भागातील तरुणांना शैक्षणिक व नोकरीसह अन्य ठिकाणी लाभ होईल. ओबीसींची निश्चीत माहीती मिळावी यासाठी शासनाकडे ओबीसी समाजाची महत्त्वपुर्ण मागणी असेलेल्या जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.यामोर्चासाठी तरुणांनी एकत्रीत येवून मोर्चात सामील होण्याचे आवाहन ओबीसी जनमोर्चा जिल्हाअध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे.

रोहा शासकीय विश्रामगृहात युवक पदाधिकारी निवडीच्या बैठकीत सुरेश मगर बोलत होते.

यावेळी ओबीसी जनमोर्चा युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश थोरे तर उपाध्यक्षपदी विपुल उभारे यांची निवड करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले

या बैठकीस जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवराम महाबळे,कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे,आगरी समाज रोहा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे,ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे,तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम, माणगाव तालुका सरचिटणीस राजेंद्र खाडे,रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे, विभागीय अध्यक्ष अमित मोहिते,शहर खजिनदार महेंद्र मोरे, युवक तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, सरचिटणीस मंगेश रावकर, मुकेश भोकटे,अमित पवार,आशिष स्वामी,अप्पा मोरे,उतेश पडवळ,प्रसाद खुळे,महेश तुपकर, हेमंत मालुसरे आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी शिवराम महाबळे यांनी ओबीसी समाजाच्या प्रवाहात युवकांनी सामील झाले पाहिजे.युवकांनी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येत असलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात सामिल होण्याचे आवाहन केले.निवडीनंतर निलेश थोरे यांनी आपण मजबुत अशी युवक संघटना समाजाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधणार असल्याचे सांगितले.या वेळी सुत्रसंचलन महादेव सरसंबे यांनी तर आभार अनंत थिटे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog