रोहा येथील हनुमान टेकडी शेजारील जंगल भागात बेवारस नवजात बालकाचा मृतदेह सापडला,दुर्दैवी घटनेने रोहा हादरला,

कोलाड (श्याम लोखंडे) निर्देयी मातेची मौजमजा;पण कोवळा जीव संपला.या घटनेने संपूर्ण रोहा तालुका हादरला,तर रोहा पोलिस स्टेशनला झाली अज्ञात स्री विरोधात गुन्ह्याची नोंद त्यामुळे आई या शब्दाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना हे वावग ठरणार नाही त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

रोहा शहरा लगत तसेच रोहा तांबडी घोसाळे भाळगाव मार्गावर हनुमान टेकडी शेजारील जंगल भागात मृतावस्थेत नवजात बालक सापडला असून सर्वत्र रोहा परिसर हादरून गेला आहे तर माता या शब्दाला काळीमा फासेल असे कृत्य सदरील मातेने केल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अष्टमी (मोहल्ला) येथील रहिवासी अफान शकील कासकर व त्याचे मित्र अमर इफ्तीखार सिद्दीकी असे दोघे बकऱ्यांना पाळा आणणेकरीता रोहा शहराच्या बाजूला असलेल्या हनुमान टेकडी जवळील जंगलभागात गेले असता सदर जंगलातील पायवाटेच्या बाजूला कोणीतरी अज्ञात स्रीने पुरुष जातीच्या नवजात अर्भकाला जन्म देऊन सदरची बाब तीचे नातेवाईक अगर इतर लोकांना समजू नये या करिता उद्देशपुर्वक सदरची बाब लपवून गुप्तपणे जन्मलेल्या अर्भकाला दिनांक 31/10/2022 रोजी वरील ठिकाणी विल्हेवाट लावली होती.

तर सदरील प्रकार बकऱ्यांना पाळा आणणेकरीता गेलेल्या शकिल व अम्मर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदरील प्रकार रोहा पोलिस स्टेशनला जाऊन ताबतोब सांगितले.तद्नंतर ही माहिती मिळताच रोहा पोलिस स्टेशनचे तपासीक अधिकारी म.सहा.फौजदार एस्.एस्.सावंत रोहा पोलिस ठाणे यांनी घटनास्थळी तपास करुन खात्री करून ही फिर्याद घेऊन तपासाअंती अज्ञात स्त्रीच्या या कृत्याबद्दल तसेच अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत झाली म्हणून गुन्हा रजि.नं. 202/2022भा.द.वी.कलम 318नुसार दिनांक 31/10/2022 रोजी 12:30 वाजता दाखल गुन्हा नोंद केला आहे.तर रोहा पोलिस स्टेशनचे पो.निरीक्षक प्रमोद बाबर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून अधिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कार्य चालू असल्याचे सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog