दहीवली हायस्कूलमध्ये पुस्तक वाटप करून केला बालदिन साजरा

 सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या हस्ते पुस्तक वाटप संपन्न

माणगाव (प्रतिनिधी )माणगाव तालुक्यातील तुकाराम साबाजी भोस्तेकर दहिवली या विदयालयात सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी बालदिनानिमित्ताने गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण संभाजी नावले यांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून वर्तन बदल व संस्कारक्षम घडवून आणणारी पुस्तके वाटप करण्यात आली.

 या कार्यक्रमाची सुरुवात गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शारदामातेचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी त्यांच्या समवेत संस्थेचे चिटणीस चंद्रकांत चेरफळे पोलीस हवालदार सौ. सानप पो. हवालदार सौ. चव्हाण, पोलीस नाईक धाडवे, पोलीस हवालदार श्री गणेश समेळ शाळेचे मुख्याध्यापक श्री जगदाळे सर, राजन पाटील सर,तसेच आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांसह फुले वाटप करून मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

 यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी स्वतः अंगी करण्यासाठी विविध उपाय सांगितले. आपल्या जीवनातील वाचनाचे महत्त्वाचे, शिस्तीचे महत्व आदी उदाहरणासह स्पष्ट केले शिक्षणाला परिस्थिती आड येत नाही याकरता थोर व्यक्तींची चरित्र वाचा त्यांचे विचार अंगीकार तसेच आई-वडिलांच्या मनाला दुःख होईल असे वागू नका खूप मोठे व्हा.वाचनाने माणूस समृद्ध होतो म्हणून आपण हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले या अगोदर दोन हायस्कूलला सुद्धा आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम केले आहेत असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog