रोहयात सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या भव्य नवरात्रोत्सवात हजारो गरबा रसिकांनी धरला ठेका भक्तीचा जागर अबालवृद्धांचा उत्साही सहभाग,
नवदुर्गांचा सन्मान!
माजी पालकमंत्री आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांनी धरला ठेका!
खांब (नंदकुमार कळमकर) रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खास रोहेकर गरबा रसिकांसाठी माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, व आ.अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा शहरात कुंडलिका नदी संवर्धन येथे भव्य स्वरुपात आयोजित नवरात्रौत्सवात रोहा शहरासह ग्रामीण भागातील आलेल्या गरबा प्रेमीनी अॅर्केस्टच्या सुरेल गीतांवर ठेका धरला.तरुणाई थिरकत असताना महीला व ज्येष्ठांनीही याचा भरभरून आनंद लुटला.ऐरवी राजकीय पदाधिकारी असलेल्या कार्यकर्ते ही ठेका धरताना दिसले ही संकल्पना भव्य स्वरुपात साकरणारे दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री आ.आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी देखील गरबा प्रेमींनमध्ये सामील होत गरबा खेळताना ठेका धरत दिसले.मोठया शहरातील उत्सवाची भव्यता रोहा शहरात दिसल्याने तरुणाईत आगळा वेगळा उत्साह दिसून आलेचे पहावयास मिळाले.
रोहा शहरासह समस्त रायगडकरांना रायगडचे लोकप्रिय खा.सुनिल तटकरेंच्या संकल्पनेतून या आधीही अनेक भव्यदिव्य कार्यक्रम पाहण्याची संधी लाभली.त्याच परंपरेला शोभेसा,आकर्षक रोषणाई ने कुंडलिका नदी संवर्धना च्या सौंदर्यात भर टाकणारा असा नवरात्रोत्सवाचे आयोजन सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. रोहाचे आराध्य ग्रामदैवत धावीर महाराजांच्या नगरीत सर्वत्र भक्तीचा जागर झालेला दिसत आहे.सुप्रसिद्ध संगीत संयोजक,महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अमीर हडकर यांच्या तालांच्या ठेक्यावर व गायकवृदांच्या जोशपूर्ण आवाजात सादर होणाऱ्या गितांवर येथील आबालवृद्ध या गरबा नृत्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.
यानिमित्ताने विविध क्षेत्रात रोहा शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येत आहे. नवरात्रौत्सववात प्रसिद्ध अभिनेत्रींची हजेरी रोहेकरांनसाठी त्यांना प्रत्यक्ष पहाण्याची पर्वणीच ठरली.ही किमया आ.अनिकेत तटकरे यांनी साधली.
मागील दोन वर्षे कोरोना मुळे सर्वच सण उत्सव हे सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंधांमध्ये साजरे होत होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे निर्बंध शिथिल होत नागरिक मनमोकळेपणे सण उत्सव साजरे करत आहेत.रोहा मध्ये देखील सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान ने दहीहंडी उत्सव जोशपूर्ण वातावरणात साजरा केला.त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले होते.यावर्षी प्रथमच सुशोभीकरण केलेल्या कुंडलिका नदी संवर्धन उद्यानाच्या भव्य पार्किंग मध्ये या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पुणे ठाणे या महानगारांच्या तोडीस असे भव्य मंडप व सभोवताली अत्याधुनिक व आकर्षक अशी नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.यासोबतच स्वतंत्र पणे साकारण्यात आलेले सेल्फी झोन सर्वांच्या नजरेतून आकर्षण ठरत आहे.लेझर शो च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या कलाकृती नेत्रदीपक वाटत आहेत. मैदानाच्या मधोमध आकर्षक मूर्तीची स्थापना करत बाजूला सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. रोहे अष्टमी शहरातील सर्व समाजबांधवांना या ठिकाणी रोज देवीची आरती करण्याची संधी देण्यात येत आहे. गरबा नृत्य पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांना, गरबा प्रेमीं व प्रेक्षकांना बसण्यासाठी दोन्ही बाजुला प्रशस्त अशी गॅलरी उभारण्यात आली आहे.
या नवरात्रोत्सवा निमित्ताने इंडियन आयडॉल गायक अभिजीत सावंत,सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांनी उपस्थिती दर्शवत रोहेकरांच्या उत्साहात सहभाग घेतला. सोमवारी आघाडीची सिने, नाट्य , मालिका अभिनेत्री शृती मराठे यांना बोलावण्यात आले होते.हजारो गरबा दांडिया प्रेमिंचा उत्साह बघून तिलाही गरबा नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. यावेळी तिच्या हस्ते व खा. सुनिल तटकरे, सौ. वरदा तटकरे,मा. पालकमंत्री आ. आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, मा. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचे उपस्थितीत नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सायकलिंग या खेळात राष्ट्रीय पातळीवर आपले गाव निडी सह रोहा तालुक्याला नावलौकिक मिळवून देणारी, महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेती प्रिताली रवींद्र शिंदे हिचा गौरव करण्यात आला.यासोबतच रोह्याच्या स्पंदन नाट्य संस्थे मध्ये अभिनयाचे धडे घेत मालिका,चित्रपट,जाहिराती मध्ये झळकणारी रोहयाची बालकलाकार संकृती शिंदे हिलाही सन्मानित करण्यात आले.यानिमित्ताने रोज विविध स्पर्धा घेत गरबा नृत्यात सहभाग घेणाऱ्याना पुरस्कार देण्यात येत आहेत.तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच भागातील नागरिक हा भव्यदिव्य दांडिया रास पाहण्यास हजारोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत.या नवरात्रौत्सवाचे नियोजन खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पालकमंत्री आ.आदीती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यानी केले आहे.
Comments
Post a Comment