रोहा वरसे ग्राम पंचायत कचरा डंपिंग ग्राउंड प्रश्न ऐरणीवर, लवकरात जागा उपलब्ध करून मिळावी रोहा तहसीलदार यांना दिले निवेदन!
कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील कचरा डंपिंग समस्या गेली पंधरा दिवसांपासून मोठी अडचणीची ठरली आहे जागे अभावी घनकचरा कोठेही फेकता येत नसल्याने ही गंभीर समस्या ग्राम पंचायतीसमोर झाली असून शासनाकडून जागा उपलब्ध करून मिळावी याकरता सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायतीच्या वतीने रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामपंचायती हद्दीतील वाढती लोखंसंख्या पाहता दिवसेंदिवस घनकचऱ्यात देखील वाढ झाली आहे त्यामुळे शासनाकडून कचरा डंपिंग ग्राउंड याकरता जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच नरेशशेठ पाटील,उपसरपंच अमित मोहिते,रामाशेठ म्हात्रे ,सह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रोहा तहसीलदार यांना निवेदन दिले व यासाठी मागणी केली आहे.
सदरच्या निवेदनात ग्रामपंचायत वरचे हद्दीतील मौजे वरसे निवी भुवनेश्वर गावांची साधारणपणे लोकसंख्या 20000 आहे तरी दररोजचा कचरा एक ते दीड टन पेक्षा जास्त कचरा निघतो कचरा घंटागाडीमार्फत उचलण्यात येतो व मोकळ्या जागेत टाकला जात होता परंतु स्थानिक शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा विरोध निर्माण झाल्यामुळे त्या जागेत कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली असून ग्रामपंचायतची पर्यायी जागा नसल्यामुळे कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तरी दिनांक 20/10/2022 रोजी ग्रामसभा लावून कचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करणे बाबत चर्चा करण्यात आली व ठराव घेण्यात आला व चालू आर्थिक वर्षात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करिता ग्रामपंचायतला निधीही मंजूर आहे तरी ग्रामपंचायत वरसे हद्दीतील निवि ठाकुरवाडी परिसरात आम्हाला घनकचरा व्यवस्थापन करिता पाच एकर जागेची आवश्यकता असून ती जागा आम्हाला आपल्या मार्फत उपलब्ध करून मिळावी असे म्हणत ग्रामपंचायत कडून विनंती अर्ज व निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले.
वरसे ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी शासन दरबारी निवेदनातून घनकचरा जागेसाठी केलेली मागणी याचा गांभीर्याने संबधित अधिकारी वर्गाने विचार करून लवकरात लवकर ही आमच्या ग्रामस्थांची घनकचरा प्रकल्पाला जागा देत ही समस्या दूर करण्यात यावी अशी विनंती मागणी केली असल्याचे सरपंच नरेशशेठ पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment