वारकरी संप्रदायची परंपरा जोपसणारा हिमेश धनावडेचा दुर्देवी मृत्यू जिवाला चटका लावून जाणारा!
गोवे गावासह कोलाड परिसरात शोककळा!
कै. हिमेश धनावडे |
गोवे कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील मौजे गोवे गावाचा रहिवासी हिमेश प्रफूल्ल धनावडे या १२ वर्षीय मुलाचा मंगळवार दि.६ सप्टेंबर रोजी झालेला दुर्देवी मृत्यू हा जिवाला चटका लावून जाणारा असून त्याच्या आकस्मित निधनाने गोवे गावासह संपूर्ण कोलाड परिसरात शोककला पसरली आहे.
पाच दिवसाचे गणपती विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकित हिमेश यांनी फाटक्याची अतिशबाजी केली होती व डीजेच्या तालावर मनोसोक्त नाचला होता व गणेश विसर्जनानंतर तो रात्री ८.३० च्या नंतर घरी आला व जेवणानंतर झोपला. नंतर रात्री ३ वाजता त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्याला रोहा येथे डॉ. जाधव नर्गिस होम येथे नेण्यात आले तेथे उपचार करुन त्याला सकाळी ६.०० वाजता घरी आणला परंतु त्याची तब्बेत सकाळी ८.०० जास्त खालवली.त्यामुळे त्याला माणगाव येथील दवाखान्यात नेण्यात आला.डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ते असफळ ठरले.
हिमेश हा एम.पि.एस. इंग्लिश स्कूल कोलाड येथे इयत्ता ६ वी.मध्ये शिक्षण घेत होता त्याला अध्यात्मिक आवडत होती.त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी गळ्यात तुळशीची माल घातली. तो पंढरपूर व आळंदी वारीला जात असत. त्याला मृदूंग वाजविण्याचा छंद होता त्यासाठी त्यांनी क्लास ही लावला होता परंतु नियतीच्या मनात वेगळे होते.त्याचा मृत्यू साप चावल्याने झाला असल्याचे बोलले जात आहे.आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना!एकुलता एक मुलगा अचानक निघून गेल्याने त्याचे आई वडील अतिशय दुःखाच्या खाईत लोटले असून गोवे गावासह संपूर्ण कोलाड परिसरात शोककला पसरली असून त्याच्या पश्चात त्याचे आई,वडील,बहीण,आजी आजोबा मूळ गाव पहूर येथील धनावडे कुटुंब,गोवे येथील पवार व जाधव कुटुंब आहे. त्याचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी होणार आहेत.
Comments
Post a Comment