सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे शक्ती तुरा नाचाचे जंगी सामने
कोलाड (विश्वास निकम )खासदार सुनिल तटकरे,आ.अनिकेत तटकरे,रायगडच्या माजी पालकमंत्री तथा आ.अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली,संयोजक सुरेश महाबळे,व रामभाऊ टेंबे यांच्या उपस्थितीत सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे गुरुवार दि.२२/९/२०२२ ते शनिवार दि.२४/९/२०२२ रोजी शक्ती तुरा जंगी नाचाचे सामूहिक सामने आयोजित करण्यात येणार आहेत.
गुरुवार दि.२२/९/२२ रोजी सकाळी ११ वा. चंडिका देवस्थान सभामंडप तळा येथे, शुक्रवार दि.२३/९/२०२२ रोजी सकाळी ११ वा. कुणबी भवन माणगाव येथे, तर शनिवार दि.२४/९/२०२२ रोजी द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे सकाळी १२ वा शक्ती तुरा नाचाचे जंगी सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून प्राप्त झाली आहे.
Comments
Post a Comment