रोहा भाजपा व हिंदू जनजागृती समिती तर्फे हिंदू राष्ट्र व लव्ह जिहाद विषयावर व्याख्यान संपन्न
कोलाड(विश्वास निकम:-रायगड भुषण) हिंदू जनजागृती समिति व भाजपा रोहे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रोहे शहरात हिंदू जनजागृती समितिचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेशजी शिंदे यांचे व्याख्यान भाजपाचे शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी आयोजित केले. व्याख्यानाचा विषय लव जिहाद, हलाल जिहाद, हिंदू राष्ट्र का हवे? साधारण दोन तासाच्या कार्यक्रमासाठी रोहेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, भाजपा रोहे शहर यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी रोह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रायकर सर, तालुक़ा कार्यवाह संजीव कवितके, अविनाश दाते, रोहे तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा जयश्री भांड, भाजपा रोहे शहर उपाध्यक्ष राकेश गुंदेशा, डॉ. मनीष वैरागी, सनातन साधक प्रकाश मोरे व परिवार, उत्तमशेट मोरे, तुषार खरिवले, दिनकर खरिवले आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment