कोलाड लघुपाटबंधारे विभाग कार्यालयात संगणकाची चोरी,तत्काळ चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद!
गोवे-कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील पुई गावा नजिक असणाऱ्या लघुपाटबंधारे कार्यालयात शनिवार दि.१३ ऑगस्ट रोजी संगणक चोरीची घटना घडली कार्यालयात सलग आलेल्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्याने ही संधी साधली. दि.१५ ऑगस्ट रोजी हा प्रकार लक्ष्यात येताच पाटबंधारे विभागाने तक्रार नोंदवली. कोलाड पोलिसांनी तत्काळ वेगाने चक्र फिरवून पुई गावातील चोरट्याला मुद्दे मलासह जेरबंद केले.
कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोलाड जवळील पुई गावाच्या हद्दीत असणाऱ्या लघु पाटबंधारे उपविभाग क्र.3 या कार्यालयात संगणक चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्या नंतर कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या व्हरांडयाच्या लोखडी ग्रील मधून प्रवेश करीत चोरट्यानी दरवाज्याची कडी उघडली त्यानंतर कार्यालयाच्या स्लाडींगची खिडकी उघडून आत प्रवेश केला व लिनोव्हा कंपनीचा २० इंची एलसीडी, फिगर कंपनीचा पिसियू लॉजिटेक कंपनीचा कीबोर्ड व माऊस केबलसह एकूण ४९५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला याविषयी कोलाड पाटबंधारे विभागाच्या लक्षात येताच चोराच्या विरोधात कोलाड पोलिस ठाण्यात भा. द. वि. क.३८०,४४५,४५७,नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.याविषयी कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शना खाली कोलाड पोलिसांनी तपास सुरु करून पुई गावातील पूर्वेश कदम (वय ३२) याला मुद्देमालासहित पकडण्यात यश आले असून याविषयी अधिक तपास सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम जी महाडिक करीत आहेत.
Comments
Post a Comment