पुस्तक हाच खरा जीवनातील मित्र आहे,पुगाव येथील ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यात शंकरराव म्हसकर यांचे प्रतिपादन!
खांब (नंदकुमार कळमकर ) संस्कृती टिकली पाहिजे एकविसाव्या शतकात तसेच संगणकीय आणि इंटरनेट युगात वाटचाल करत असताना दुर्दैवाने वाचक संस्कृती ही लोकपावन झालेली आहे मर्दानी खेल देखील आता पूर्वीसारखे राहिलेले नाही खेळ म्हणून सध्याच्या युगात लहान मुलांना खेळायचा झाला तर मोबाईल हे हातात खेळणं झालेले आहे त्यामुळे जीवनात वाचाल तर वाचाल शिकाल तरच टिकाल पुस्तक हाच खरा जीवनातील मित्र असल्याचे प्रतिपादन कुणबी समाजनेते शंकरराव म्हसकर यांनी पुगाव येथील स्व.हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथ लोकार्पण सोहल्याप्रसंगी केले.
रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे म्हसकर कुटूंबियांच्या वतीने पुगाव येथे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहात स्व. हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालयाचे लोकार्पण सोहळा श्रीमती अनुसया म्हसकर तसेच रोहा तालुक्याचे कुणबी समाज तथा जेष्ट नेते मारुतीराव खरीवले तसेच शंकरराव म्हसकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाले यावेळे शंकरराव म्हसकर बोलत होते यावेळी
यावेळी विचार मंचावर तानाजी जाधव,सुधीर क्षीरसागर,शिवराम महाबळे,मारुती खांडेकर सर मनोहर महाबळे,दिवाण सानप, संभाजी निबरे,नारायण धनवी,वसंत खांडेकर,अनंत म्हसकर,रंगाजी म्हसकर,नारायण अधिकारी,पुगाव ग्राम पंचायत ग्राम सेवक शिद,प्राथमिक शिक्षक तथा पुगाव शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास थले, केशव बागुल,बाळाराम धामणसे, निलेश हुले,येळकर गुरुजी,डॉ आदित्य महामुनकर आदित्य नर्सिंग होम, डॉ प्रणिती डॉ केतकी,मधुकर कळमकर,रामदास म्हसकर,शंकर शेलार,प्रकाश साळुंखे, राजेंद्र देशमुख, महेश बामुगडे, उत्तम गोळे,गंगाराम दळवी, नितीन जाधव, मुठवली सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गणेश म्हसकर, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर शेलके ,सुधागड तालुक्याच्या माजी सभापती सौ भारती शेळके,सौ मेघा ताई पुगाव ग्राम पंचायत सरपंच नेहा म्हसकर, सदस्य गणेश म्हसकर,रचना कळमकर, अदिती झोलगे, निलम कळमकर,सह आदी म्हसकर कुटूंब व पुगाव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .
लोकार्पण करण्यात आलेल्या स्व.हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर ग्रंथालयात नाट्य विभाग,आध्यत्मिक विभाग,उद्योग साहित्य,बाळ साहित्य विभाग,कथा कादंबरी, कविता विभाग शेतकरी साहित्य,राष्ट्रीय थोर पुरुषांचे चरित्र विभाग ,असे विविध स्वरूपात धार्मिक तथा आध्यात्मिक ग्रंथ तसेच विविध प्रकारचे सहाशेहून अधिक पुस्तके या ग्रंथालयात म्हसकर कुटूंबियांच्या वतीने उपलब्ध केली असल्याचे सांगत प्रत्येक क्षेत्रात भरारी घेयाची असेल तर ज्ञान आपल्याला अवगत करन गरजेचे आहे तर वाचन हे केलेच पाहिजे ग्रंथ हे आपल्याला धर्म शिकवतो आणि धर्म हा आपल्याना माणसांनी कस वागावं हे शिकवतो चांगला वाचन केल्याने एमपीएससी यूपीएससी आय एस आय आशा स्पर्धा परीक्षेत मुलांना चांगले भाग घेता येईल असे मौलिक मार्गदर्शन म्हसकरराव यांनी यावेळी केले.
तसेच यावेळी या ग्रंथालयात अधिक पुस्तके उपलब्ध करण्यासाठी श्री व सौ क्षीरसागर यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला तर श्रीनिवास थले यांनी प्रकाशित केलेले कविता काव्य संग्रगाची वीस प्रति या ग्रंथालयास भेट दिल्या तसेच अधिकारी यांनी देखील विविध पुस्तक भेट दिली.उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते मारुतीराव खरीवले,सुधागड च्या माजी सभापती सौ भारती शेळके,सौ अलकताई क्षीरसागर, शिवराम महाबळे,नारायणराव धनवी,नारायण अधिकारी,यलकर गुरुजी,सुधीर शेळके,बाळाराम धामणसे,श्रीनिवास थले,मेघाताई ,रामदास म्हसकर,यांनी स्व.हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर यांच्या जीवन आधारित मनोगत व्यक्त करत त्यांच्या नावाने लोकार्पण करण्यात आलेल्या या ग्रंथालयाला शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन स्वरस्वती व स्व.हरिभाऊ म्हसकर यांच्या प्रतिमेचे पूजन, ईश्वस्तन व स्वागत गीत डॉ केतकी यांनी म्हटले ग्रंथालयाचे लोकार्पण सोहळा आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अलका क्षीरसागर यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन बबन म्हसकर यांनी करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment