तळा येथे अंगणवाडी मदतनीस व पाच वर्षाची बालिका यांचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू 

          आणखी  दोन बालके जखमी त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक!

  मद्यधुंद अवस्थेत  वाहन चालक असल्याची चर्चा!

तळा:-(कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील अंगणवाडी सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ हीचा व पाच वर्षे बालिका यांचा अपघातात जागीच दुदैवी मृत्यू झाला आहे. त्यातच आणखी दोन बालके जखमी झाली असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 

    याबाबत ची हकीकत अशी की प्रज्ञा प्रशांत सकपाळ

वय वर्षे ३२ या अंगणवाडी आनंद वाडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्या सकाळी १० वाजता वावेहवेली फाटयानजिक असलेल्या आदीवासी पाडयावर असलेल्या सारीका संदिप जाधव वय वर्ष ५, रियांश रमेश पवार वय वर्ष ५, रिया रमेश पवार वय वर्ष ४ अशा बालकांना घेऊन पायी रस्त्याने आनंदवाडी च्या दिशेने म्हणजे तळा रस्त्यावर प्रवास करत असताना तळा कडुन इंदापूर कडे घेऊन जाणाऱ्या इनोव्हा गाडी एम. एच. ४६ डब्ल्यू ५१७७ ही गाडी जयेंद्र भागोजी पारावे बेदरकार पणे चालवित असताना हा अपघात घडला.

       सदरच्या अपघातात अंगणवाडी सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ वय ३२ वर्ष व सारीका संदिप जाधव वय वर्ष ५ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घटना स्थळाला भेट घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय माणगाव व अत्यवस्थ असलेल्या जखमींना जिल्हा रुग्णालयअलिबाग  येथे हलविण्यात आले आहे. हा गाडीचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसुन आले आहे.

 त्याच्या विरुद्ध भा. द. वि. कलम मोटार वाहन कलम ३०४(२) २७९,३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची अधिक चौकशी तळा पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शनाखालीअधिक तपास होत आहे.

Comments

Popular posts from this blog