रोहयात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!
१६३ जणांची केली तपासणी ५४ रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी पनवेलला पाठविले,
रोहा तालुका सिटीझन फोरम आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचा उपक्रम,
रोहा (प्रतिनिधी) रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट (रजि.) आणि नविन पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात १६३ जणांची तपासणी करण्यात आली तर ५४ रुग्णांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
रोहा येथिल ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित या सेवाभावी उपक्रमात रुग्णांची नेत्र तपासणी, अल्पदरात चष्मे वाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदींचे विनामूल्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथिल आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉक्टर संदेश पाटील, प्रतिभा गावीत, गायत्री चौरसिया, तान्या कटियार, समृद्धी, नरेश आवलर, शिल्पेश साठम आदींनी तपासणी कार्यात सहभाग घेतला. रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख, संतोष खटावकर, महेश सरदार, श्रीकांत ओक, संदीप सरफळे, इल्यास डबीर, निलेश शिर्के, राजेश काफरे, प्रशांत देशमुख, शैलेश रावकर, अमोल देशमुख, दिनेश जाधव, भावेश अग्रवाल, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर आदिंनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या मोतीबिंदू शिबिरासाठी आशा सेविका संजिवनी चाळके, मंथना झुरे, सिमरन कडव, सुप्रिया बठारे, प्रज्ञा लहाने, प्रमिला भगत, प्राची वाघमारे, अंजिनी भगत, नंदिनी भोईर, सायली साबळे, सानिया काटे यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी दिलेल्या योगदानासाठी आशा सेविकांना सिटीझन फोरमतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment