वरसगांव नाका येथील उषा शिंदे यांचे दुःखद निधन
गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील वरसगांव नाका येथील रहिवाशी उषा मारुती शिंदे यांचे शनिवार दि.१६ जुलै २०२२ रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्या प्रेमळ व शांत स्वभावाने त्या सर्वाना परिचित होत्या.त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्यात प्रकाश,सुरेश,नरेश,हे तीन मुलगे,तीन मुली, सुना,जावई, नातवंडे, व मोठा शिंदे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.२५ जुलै तर उत्तरकार्य विधी बुधवार दि.२७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या वरसगांव नाका येथील राहत्या घरी होतील.
Comments
Post a Comment