कोलाड परिसरासह रोहा तालुक्यात पावसाची तुफान फटकेबाजी,भिरा,डोळवहाल सुतारवाडी येथील धरणाची पातळी वाढली,नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
गोवे-कोलाड (विश्वास निकम)सतत दोन दिवसापासून कोलाड सह रोहा तालुक्यात पावसाची जोरदार फटकेबाजी सुरु असून यामुळे भिरा, डोळवाल, सुतारवाडी येथील धरणाची पातळी वाढली असून कुंडलिका, महिसदरा नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून नदिकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता जुलै महिन्याच्या तीन तारखेपर्यंत अशीच स्थिती होती. मात्र पावसाने ऊन पावसाचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून बळीराजा धास्तावला होता. नांगरणीची काम उरकून पेरणी केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे असताना दिनांक ४ जुलैपासून दुपारनंतर पावसाने तूफान पर्जन्यवृष्टी केल्यामुळे रोहा तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.परंतु असाच पाऊस दोन दिवस पुढे सुरु राहिला तर भात शेतीचे नुकसान होऊ शकते असे ही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे कोलाड परिसरातील शेती ही पाण्याखाली गेली असून कोलाड कडून गोवे गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे बाजारातील खरेदीसाठी येणारे ग्राहक मंदावले. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. हवामानाच्या अंदाजानुसार पाऊसही जोरात व नियमित पडत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या रिक्षा किरकोळ प्रमाणावर रस्त्यावरून धावत होत्या.
Comments
Post a Comment