कोलाड -रोहा मिनिबससेवा सुरु करा, विद्यार्थी, पालकवर्गासह प्रवाशांची मागणी
गोवे-कोलाड (विश्वास निकम )रोहा-कोलाड मिनिबससेवा ही अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे परंतु ती मिनिबससेवा अद्याप सुरु करण्यात आली नाही यामुळे विद्यार्थी, पालकवर्ग व प्रवाशी वर्गातून रोहा-कोलाड मिनीबससेवा सुरु करण्यात अशी मागणी केली जात आहे.
१३ जून पासून शाळा कॉलेज नियमितपणे सुरु झाले असून कोलाड रोहा मार्गावर कै द.ग तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रीग्रोरियन स्कूल, एम. बी. मोरे, राठी स्कूल, डॉ सी.डी.देशमुख कॉलेज तसेच इतर कॉलेज असल्यामुळे या मार्गावरून कोलाड कडून रोहा कडे व रोहा कडून कोलाड कडे शाळा कॉलेजला जाणारे येणारे हजारो विद्यार्थी येजा करीत असतात कोरोनामुळे शाळा कॉलेज बंद करण्यात आले होते तसेच एस टी संप यामुळे कोलाड रोहा मिनिबससेवा बंद करण्यात आली होती. परंतु सर्व परिस्थिती पूर्व पदावर आली आहे.
तसेच याशिवाय या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे असंख्य कामगार वर्ग, रोहा कडे तहसील कार्यालय व इतर कामासाठी जाणारे तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक, याच मार्गावरून येजा करीत असतात यामुळे
या मार्गांवर मिनीबससेवा सुरु करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
प्रतिक्रिया
या मार्गांवर कोलाड जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे सभागृह असल्यामुळे या मंडळात ५०० वर सभासद असून या मंडळाच्या वेळोवेळी सभा घेतल्या जातात तसेच जेष्ठ नागरिक यांना शासनाकडून आर्धा तिकीटची सुविधा केली आहे परंतु या मार्गांवर
मिनिबस सेवा सुरु नसल्याने याचा फटका जेष्ठ नागरिकांना बसत आहे यामुळे या मार्गावर ठरविक वेळेनुसार मिनिबस सेवा सुरु करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिक दगडू बामुगडे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment