चिल्हे येथील कष्टकरी माथाडी कामगार भगवान महाडिक यांचे निधन
कै. भगवान महाडिक |
कोलाड ( श्याम लोखंडे )रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील मेहनती आणि कष्टकरी ज्यांची माथाडी कामगार (हमाल ) अशी मोठी वेगळी ओळख असलेले भगवान मऱ्या महाडिक यांचे 25 मे रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे .मृत्यूसमयी ते 55 वर्षाचे होते.
भगवान मऱ्या महाडिक हे मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे तसेच सर्वांशी मिळून मिसळून वागणारे हाताला मिळेल ते काम करणं हा मूळचा त्यांचा स्वभाव होता अंत्यत गरीब कुटूंब जीवन जगत नजीकच्या धाटाव औद्योगिक क्षेत्रात दररोज माथाडी कामगार म्हणून हमालीचे काम करून ते त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत असत असे मेहनती आणि कष्टकरी भगवान महाडिक यांच्या निधनाने महाडिक कुटूंबावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ पुतणे असा मोठा परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवारी 3 जून व उत्तरकार्य ( तेरावे )सोमवारी 6 जून 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्राप्त झाली आहे.
Comments
Post a Comment