रोहा चिंचवली तर्फे आतोणे खरबाची आदिवासी वाडीवर मोठी पाणी टंचाई!
चिखलमय पाण्याचा करावा लागतो प्राशन,
तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन,
तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल तहसीलदारांचे आश्वासन!
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली तर्फे आतोने ग्राम पंचायतीचा अजब कारभार हद्दीतील खरबाची वाडी ,वडाची वाडी,धनगर माळ, मोठी वाडी,आशा या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत असून देशात व या राज्यात देश स्वातंत्र्य काळात आदिवासी महिलांना आज देखील दोन कोस दूरवर पायपीट करत पाणी भरावे लागते तर एवढेच नव्हे तर भल्या मोठ्या पाणी टंचाईला सामना करत नाइलाजास्तव जीवन जगण्यासाठी चिखलमय पाणी पाशन करावा लागत असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांनी आज 13 जून रोजी याबाबतचा पाढा रोहा तहसीलदार व गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्या समोर मांडत निवेदन देत ताबडतोब आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करा अशी मागणी या आदिवासी भगिनी माता व ग्रामस्थ नागरिकांनी केली याला तात्काळ दुजोरा देत रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव व गट विकास अधिकारी श्रीमती शुभदा पाटील यांनी सदरच्या वाडीवर तत्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिले.
रोहा तालुक्यातील सर्वात ग्रामीण आणि दुर्गम भाग म्हणजे विठ्ठलवाडी, राजखलाटी,गारभट , कांदळे, ,परिसर हा गणित आहे आणि या परिसरातीलच चिंचवली तर्फे आतोने ग्राम पंचायत हद्दीतील खरबाची वाडी,सह येथील चार आदिवासी वाड्यांचा समावेश येत असलेल्या वरील वाड्या काही मूलभूत सोयी सुविधांपासून देशाच्या स्वातंत्र्य काळात देखील वंचित आहेत व वाड्यांवर त्याच बरोबर गेल्या महिन्यांपासून येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे
एवढेच नव्हे तर नाईलाजाने तळ गाठलेल्या विहिरीतील चिखलमय पाणी पिण्याची वेळ स्थानिक ग्राम पंचायत प्रशासक यंत्रणेमुळे आली या गोष्टीला जबाबदार कोण असा सवाल सर्वत्र उठला आणि पाण्या अभावी जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली गुरे ढोरे बकऱ्या प्राणी यांना सोडाच मात्र मानवी जीवन जगावे या करता देखील पाणी नसल्याने येथील ग्रामस्थानीं थेट रोहा तहसीलदार यांचेकडे धाव घेत याबाबतचे निवेदन रोहा तहसीलदार साहेबा व गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना देत स्थानिक कारभाराची हकीगत सांगीतली आणि आम्हा आदिवासी नागरिकांना ताबडतोब पिण्याचे पाणी मिळावे अशी आग्रही मागणी केली.
येथील आदिवासी वाड्यांवर तात्काळ खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल :- तहसीलदार कविता जाधव रोहा
वरील निवेदांचा ताबतोब पाठपुरावा करण्यात येईल येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईला सामना करावा का लागतो याची माहिती घेऊन त्या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुढील कालावधीत कशी करण्यात येईल या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला जाईल तसेच या वर्षी पावसाळा लांबल्याने अनेकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु सदरच्या ग्रामस्थांना या ठिकाणी तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा ही खाजगी टँकरद्वारे करण्यात येणार असल्याचे आश्वासन रोहा तहसीलदार साहेबा यांनी यावेळी आदिवासी ग्रामस्थ महिला यांना दिले .
स्थानिक राजकारण वेतलाय सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर :- संतोष कळंबे
आमच्या अशिक्षित साध्या आणि भोळे पणाचा फायदा स्थानिक राजकीय पुढारी घेत आहेत दोन तीन वर्षांपूर्वी नवी विहीर बांधली तसेच गाव परिसरात पाच ते सहा बोरवेल मारल्या आहेत मात्र त्यात पाणी आहे की नाही हे कोण बघणार स्थानिक ग्राम पंचायत याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे आम्ही आदिवासी ग्रामस्थ स्थानिक पुढाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे आम्हा गरीब कुटुंबावर पाणी टंचाईची वेळ आली आम्ही आदिवासी बांधव दाद कोणाकडे मागणार अनेकदा या बाबतीत सदर चे ग्राम पंचायतमध्ये संपर्क साधला मात्र अधिकारी वर्ग व स्थानिक पुढारी दाद देत नाहीत गेली महिनाभर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो
नाईलाजाने विहिरीतील चिखलयमय पाणी अशुद्ध पाण्याचा वापर आम्हा ग्रामस्थांना करावा लागत आहे त्यामुळे लहान मुलांना माणसांना रोग राईचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वाटत आहे विहिरीकडे जाण्याचा मार्ग रस्ता देखील अत्यंत दरडी मार्ग व धोकादायक आहे तसेच दोन कोस दूर दगड धोंड्यातून महिलांना तारेवरची कसरत करत पायपीट करावी लागते एवढेच नाही तर अखेर शेवटी विहितील गाळ देखील ग्रामस्थ एकत्रित येऊन काढला तरी देखील या गोष्टींकडे गांभीर्याने कोणी लक्ष देत नाही शासनाच्या सोयी सुविधा आपल्या दारी तरी लाखो करोडो रुपये सरकार ग्रामीण भागात विकासावर करत आहे थेंब थेंब पाण्यासाठी अखेर येथील आदिवासी बांधवाना व महिलांना वणवण करावं लागत असल्याने आज 13 जून रोजी रोहा तहसीलदार व गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना वरील ग्रामस्थांनी निवेदन दिले असून सदरच्या निवेदनावर तहसीलदार साहेबा यांनी ताबतोब टँकरद्वारे पाणी पुरवठा उपाययोजना करणार असल्याचे अश्वासन दिले आहे .
पाण्यासाठी तातकाल उपाययोजना केली जाईल :- गट विकास अधिकारी पं. स.रोहा :- शुभदा नि.पाटील
रोहा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदाचा पदभार नुकताच नव्याने स्वीकारले आहे या ठिकाणी रुजू होऊन दोन ते तीन दिवस झाले आहेत तसेच आदिवासी ग्रामस्थांच्या निवेदनावर सदरच्या ग्राम पंचायत कारभाराची माहिती घेतली जाईल पाणी टँचाई बाबत योग्य ती त्वरित उपाययोजना करून या आदिवासी ग्रामस्थांना तातकाल टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सतत'दे'साई मागणारा त्या ग्रामसेवकाचा मोबाईल सतत असतो स्विच ऑफ,
येथील ग्रामपंचायत मध्ये असणारा सतत 'दे' साई मागणारा ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर मोबाईल सतत बंद असतो कधीकाळी फोन लागलाच तर तो कोणाचेही फोन उचलत नसल्याची चर्चा असून 'दे,साई मागणारा ग्रामसेवक कामात कामचुकार व मलिदा खाण्यात एक नंबर असल्याची चर्चा असून सतत' दे, साई मागणाऱ्या ग्रामसेवकाची उचलबांगडी करावी अशी मागणी केली जात असल्याची चर्चा आदिवासी बांधवांमध्ये केली जात आहे.
Comments
Post a Comment