सनातन संस्‍थेच्‍या वतीने पनवेल येथे २८ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडीचे' आयोजन!

  गोवे-कोलाड (विश्वास निकम )सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने संस्‍थेच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्राच्‍या जागृतीसाठी ‘हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान’ राबवण्‍यात येत आहे. या अभियानाच्‍या अंतर्गत *सनातन संस्‍थेच्‍या वतीने शनिवार, २८ मे २०२२ या दिवशी पनवेल येथील धूतपापेश्वर कॉर्नरजवळील स्वा. सावरकर चौक येथून सायंकाळी ५ वाजता 'हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले आहे.*  रायगड जिल्ह्यांतील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, सामाजिक संघटना, संप्रदाय, समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी होणार आहेत.

     आज कधी नव्हे एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदू धर्मीयांना जात, प्रांत, संप्रदाय आणि भाषा यांमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू ऐक्याचा विशाल अविष्कार दाखवून हिंदू बांधवांनी संघटित होणे आवश्यक आहे. भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवत, संघटिपणाचा संदेश देणाऱ्या या प्रबोधनपर ‘हिंदू एकता दिंडी’त लोकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन सनातन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

    परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्वप्रथम हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना समाजासमोर मांडली. त्यानुसार सहस्रो हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते, देशभरातील अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना या हिंदु राष्‍ट्र स्थापनेच्‍या कार्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत आहेत. हिंदु राष्‍ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत गेल्या २ आठवड्यापासून मुंबईसह देशभरात आत्तापर्यंत एकूण ३० ठिकाणी हिंदू एकता दिंड्यांचे आयोजन करण्यात आले, यामध्ये सहस्रो हिंदू बांधवांचे संघटन करण्यात आले. याव्यतिरिक्त गेली एक महिना रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्हयांसह देशभरात ठिकठिकाणी मंदिर स्‍वच्‍छता, हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणे, असे उपक्रमही राबवण्‍यात आले, ज्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

    हिंदू एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्‍हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. राष्‍ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांच्या महान कार्याविषयीचे प्रबोधनही या फेरीत केले जाणार आहे. सोशल मीडिया, फलक प्रसिद्धी यांसह विविध माध्यमांतून सुरु असलेला हिंदु एकता दिंडीचा प्रसार आता अंतिम टप्प्यात आला असून याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदू एकता दिंडी विषयी अधिक माहितीसाठी 9819242733 या क्रमांकावर संपर्क करा, असे सनातन संस्‍थेच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  ' *हिंदू एकता दिंडी'चा मार्ग पुढीलप्रमाणे : आरंभ* - स्वा. सावरकर चौक, श्री धूतपापेश्वर कॉर्नरजवळ, पनवेल, *दिंडीचा मार्ग :* बल्लाळेश्वर मंदिर - जाखमाता मंदिर - दांडेकर क्लिनिक - वाघेज स्नॅक्स कॉर्नर - हनुमान मंदिर - विरूपाक्ष मंदिर - जुने पोस्ट ऑफिस - लोकमान्य टिळक रोड - रामदास मारुती मंदिर - जय भारत नाका - अप्पा साहेब पन्हाळे रोड - पनवेल भाजी मंडई रस्ता - उरण रोड मार्गे, *समारोप* : छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल

Comments

Popular posts from this blog