तरुण आणि जेष्ठ यांनी एकमेकांचा आदर केला तर समाजाची घडी बसायला वेळ लागणार नाही:-प्रा. सुनिल देवरे

गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ज्या संघटनेला भरारी घ्यायची असेल तर युवकांनी हा विचार केला पाहिजे कि मी उद्याचा जेष्ठ आहे.व जेष्ठानी असा विचार केला पाहिजे कि मी कालचा तरुण होतो. तरुणांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे परंतु त्यासाठी जेष्ठाचे मार्गदर्शन व सल्ला घेणे अधिक महत्वाचे आहे. कारण ते अनुभवाने मोठे आहेत.जेष्ठाना ही आव्हान आहे कि कृतीतून मार्गदर्शन केले पाहिजे.एखाद्या जेष्ठ उच्च पदावर असेल पण त्यांनी एखाद्या कार्यक्रमात पत्रावली उचलणायचे काम केले तर त्यातून दुसऱ्याला प्रेरणा मिळेल यामुळे तरुण जेष्ठ यांनी एकमेकांचा आदर केला तर समाजाची घडी बसायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन कोलाड विभाग आयोजित भव्य कुणबी मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहल्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनिल देवरे यांनी केले.

कुणबी समाजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड विभागाच्या वतीने आंबेवाडी कोलाड येथे आयोजित केलेल्या भव्य कुणबी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहल्याप्रसंगी ते विशेष मार्गदर्शनपर बोलत होते .यावेळी कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर, शिवराम शिंदे,मोतीराम तेलंगे,सुरेश मगर, महादेव आग्री, शिवराम महाबळे, सुरेश महाबळे, डॉ सागर सानप,,राजेश सानप, डॉ. मंगेश सानप, समिर महाबळे, पांडुरंग सानप,सौ चेतना लोखंडे, सौ.सुनीता महाबळे,निलम कदम,दिवान सानप, दत्ताराम झोलगे,

 सुनिल ठाकूर, राम ठाकूर, संतोष बाईत, वसंत भोईर, अशोक आईत, विशाखा राजीवले, दर्शन तेलंगे, बाळा महाबळे, संजय राजीवले, सिद्धी राजीवले,एकनाथ बागुल, दगडू शिगवण, मारुती लोखंडे, पांडुरंग जवके, महादेव महाबळे, गंगाराम दळवी, पाटेकर गुरुजी, अनंत मगर, दगडू बामुगडे,संजय कुर्ले सह प्रमुख मान्यवर व आदी समाज बांधव व गुणवंत विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .

अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या कोलाड विभागीय कुणबी समाज मेळाव्यात ते अधिक मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना (ब्रिटिश ) इंग्रजानी मागणी केली कि या देशात कोणते समुदाय आहेत या संदर्भात ५ नोव्हेंबर १९२८साली एक समिती नेमली त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग असे अहवाल सादर केला.परंतु ते निघून गेल्यावर ज्यांनी धुरा सांभाळली त्यांनी १९९२पर्यंत स्विकारली नाही जर गवळी समाज ओबीसी होता, लोहार समाज ओबीसी होता त्यांचा निकष वापरून एन टी.मध्ये  समावेश केला. कोळी समाज एस टी मधून एस पी.सी मध्ये समावेश होतो. निकष बदलू शकतात त्यासाठी कुणबी समाजासाठी १९६७ जे प्रमाण वर्षे दिले आहेत ते १९९० ते २००० केले तर सर्रास नोंदी मिळतीलअसे उत्तम प्रकारे उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

यासाठी समाज्याची संघटना महत्वाची आहे समाज टिकवायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांचे म्हणणे पटवून घेतले पाहिजे त्यातूनच समाज सुधारणास चालना मिळेल असे सांगत पालघर जिल्हात जात निहाय जनगणना केली तर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा झाला तेथे आमदार आदिवासी समाजाचा आहे तर कोकण पट्टयातील जनगणना केली तर ६५ ते ७० टक्याच्या घरात ओबीसी समाज गेल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे या विभागात कुणबी समाजाचा आमदार, खासदार असेल त्यासाठी बहुसंख्येने एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे यासाठी संघटना मोठी करणे अधिक गरजेचे गरजेचे असल्याचे शेवटी प्रा. देवरे यांनी व्यक्त केले.

प्रसंगी यावेळी उद्योजिका सौ निलम कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि विकास म्हणजे रस्ते,पाणी, विज आली म्हणजे विकास नाही आपल्या समाजातील किती मुलांना नोकरी कामधंदयाला लावले आहे हा खऱ्या अर्थाने विकास होईल यासाठी समाजातील लोकांनी समाज बांधिलकी करावी.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या  कुणबी मेळाव्यात मार्गदर्शन केले.तसेच कोलाड विभाग आयोजित भव्य कुणबी मेळाव्यात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

तसेच सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी कोलाड विभाग कुणबी ग्रुप अध्यक्ष संदेश लोखंडे, उपाध्यक्ष गणेश निवाते, सचिव संतोष निकम, खजिनदार संदीप मालुसरे, प्रसाद सानप, महेश ठाकूर, गणेश बाईत, राजेश कदम, चंद्रकांत लोखंडे, नरेश बिरगावले, गणपत लोखंडे,कोलाड विभागाचे सर्व सदस्य यांनी अधिक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog