चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून ८वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू तर, तीन जण जखमी!
तळा (कृष्णा भोसले)तळा तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून आठ वर्षाची मुलगी मृत पावली असून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की चरई आदिवासी वाडी येथे रहात असलेल्या सुनिता अशोक मुकणे या आपल्या चार मुलांसह घरी रात्री झोपल्या असता सकाळी ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने त्या जाग्या झाल्या असता भिंत कोसळून त्याखाली सुवर्णा मुकणे( वय ८) संतोष मुकणे(वय १०) ,तन्वी मुकणे(वय ४),तुषार मुकणे(वय ८),ही आपली मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याचे त्यांनी पाहिले.व तात्काळ त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.त्यांचा आवाज ऐकूनच शेजारी रहात असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले व त्यांनी ढिगारा बाजूला करून सर्व जखमींना बाहेर काढले.यावेळी डॉक्टरांना बोलावले असता डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेली सुवर्णा अशोक मुकणे वय वर्षे ८ ही मृत झाल्याचे सांगितले तसेच दोघा जखमी मुलांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून असून दोघांना मुंबई येथे हालविण्यात आले आहे.
सदर प्रकरणी तळा पोलीस ठाणे येथे गुन्हा र.नं ४ /२०२२ नुसार भादवि कलम १७४ प्रमाणे दाखल झाला आहे.सदर प्रकरणी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सतिश जगधणे अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment