कोलाड येथे जेनेरिक मेडिकलचे शुभारंभ सामान्य रुग्णांना मिळणार स्वस्त दरात औषधे
खांब (नंदकुमार कळमकर ) मुबंई गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड नाक्यावर तिसे गावचे सुपुत्र नरेश बिरगावले यांचे श्री समर्थ जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे शुभारंभ कोलाड आंबेवाडी वरसगाव विभागीय युवा नेते तथा समन्वय समिती सदस्य राकेश शिंदे,यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी आंबेवाडी ग्राम पंचायत उपसरपंच जगन्नाथ धनावडे, सदस्य कुमार लोखंडे, बाळासाहेब फुलाटे सी ई ओ जनआरोग्य जेनेरिक प्रा. लि. अभिजित पाटणकर डायरेक्टर जनआरोग्य जेनेरिक प्रा.लि.सचिन साखलकर,अभिजित सातपुते,हेड ऑफ सेल्स मार्केटिंग ,संकेत पाटणकर एरिया बिजनेस हेड कोकण विभाग,लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे बोर्ड ऑफ डायरेक्टर तथा गांधी नर्सिंग होम चे व्यवस्थापक डॉ विनोद गांधी, कोलाड लायन्सक्लब चे खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,मेंबर्स नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,जेष्ठ नागरिक ,खराटे व कोलाड परिसरातील डॉक्टर्स,रोहा तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंढे ,संजय मांडलूस्कर ,राजेश कदम,राकेश लोखंडे,व आदी तिसे ग्रामस्थ व जेनेरिक जनआरोग्य सेवेचे सर्व पदाधिकारी बिरगावले परिवार यावेळी उपस्थित होते.
कोलाड येथे नव्यानेच नरेश बिरगावले यांनी सुरू केलेल्या श्री समर्थ जनआरोग्य जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे शुभारंभ प्रसंगी कोलाड विभागातील डॉ विनोद गांधी,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे डॉ वाघ डॉ प्रणित दिघे,डॉ नमिता दिघे,डॉ टीवाडे,डॉ वरूठे,डॉ ठाकरे,डॉ कदम तिसे गावचे माजी उपसरपंच व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिगवण ,यशवंत खराडे,डॉ श्यामभाऊ लोखंडे,नंदकुमार कळमकर,विश्वास निकम यांनी त्यांनी या प्रसंगी सदिच्छा भेट देत बिरगावले परिवाराला शुभेच्छा दिल्या.
कोलाड आंबेवाडी परिसर व नाका सातत्याने गजबजले असते तसेच 60 ते 65 गावे आदी वस्त्यांचे समावेश असलेला कोलाड नाका आणि मोठी बाजारपेठ तर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी दवाखान्यांचा देखील समावेश आहे परंतु येथील ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक तथा रुग्णांना अल्प व स्वस्त दरात जेनेरिक औषधे नरेश बिरगावले यांच्या माध्यमातून या मेडिकल मधून उपलब्ध होणार आहेत त्यामुले येथील सर्व सामान्य नागरिकांनी व रुग्णांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते व तिसे ग्राम पंचायत चे माजी सरपंच राजेश कदम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment