पुई येथील महिसदरा पुलावर ट्रेलरचा टायर पंचर झाल्यामुळे वाहतूक कोंडी,
प्रवाशी वर्गाला करावा लागला उष्णतेचा सामना!
गोवे कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा हायवे वरील पुई गावानजिक असलेल्या महिसदरा नदीवरील पुलावर ट्रेलरचा टायर पंचर झाल्यामुळे या महामार्गांवर सकाळी दहा वाजता मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यामुळे प्रवाशीवर्गासह वाहन चालकांना ताटकळत उभे राहून उष्णतेचा सामना करावा लागला.
मुंबई-गोवा हायवरील महिसदरा हा पुर्ण जीर्ण झाला असून हा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक आहे. अशा बातम्या वर्तमान पत्रातून अनेक वेळा प्रकासित झाल्यानंतर महिसदरा नदीवरील नविन पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी बनविण्यासाठी सुरवात केली पण नदीच्या दोन्ही बाजूचा खालचा पाया खोदून तो अर्धवट स्थितीत ठेवला आहे.दोन वर्षे झाली तरी या पुलाचे काम तसेच शिल्लक ठेवून नंतर जीर्ण अवस्थेत असलेल्या जुन्या पुलाच्या डागडुगिचा काम सुरु असून त्याला बाहेरून प्लास्टर करून नवीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे परंतु अगोदरच अरुंद पुल व जीर्ण झालेला पुल किती दिवस टिकेल याची खात्री देता येत नाही यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाचा खेळ मांडला आहे.
मुंबई गोवा हायवे वरील पनवेल ते इंदापूर इंदापूर दरम्यानचे रस्त्याचे काम १२ वर्षापासुन सुरु असून या कामात कोणतेही प्रगती नाही.या महामार्गाच्या कोणतेही प्रगती नाही परंतु या महामार्गावरील असणारे व्यवसायिकयांना १२ वर्षापूर्वी कोणतेही सबब न ऐकता त्वरित त्यांच्या दुकानावर जणू नांगरच फिरवण्यात आला होता यामुळे रस्त्याचे काम तर पुर्ण झाले नाहीच पण व्यवसायिकांवर उपसमारीचे वेळ आणली आहे.
या महामार्गासाठी शासनाचे कोरोडो रुपये खर्च करुन वाया गेल्यानंतर दोन महिण्यापुर्वी इंदापूर येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते कि या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने कॉक्रिटिकरण करून एका वर्षात पुर्ण करू असे सांगितले होते पण अद्याप कामाचा पत्ताच नाही ते हवाई मार्गाने आले होते.त्यांना फक्त हिरवळ दिसली होती. रस्त्यानी प्रवास केला असता तर प्रवाश्यांच्या वेदना कळल्या असत्या परंतु रोज होणारी वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते व रस्त्याला पडलेले खड्डे यापासून केव्हा सुटका असा खडा सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
Comments
Post a Comment