महाराष्ट्राच्या विधिमंडळात संभाजी राजांची प्रतिमा, आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगड वासियांची मान उंचावली!
कोलाड़ नाका (शरद जाधव) लोकप्रतिनिधी कसा असावा. त्याच्याकडे दूरदृष्टीकोन असावा.विविध बारकावे हेरण्याची कला असावी.आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आमचे दैवत छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिमेचा फोटो लावन्यात यावा ही मागणी केली. अणि ती मागणी तत्काळ मान्य देखील झाली. अणि रायगड वसियांची मान उंचावली. या मागणीचे खरोखरच कौतुक होत असुन वा भाई तुम्ही कमालच केलीत अशी चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सभागृहात थोर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची प्रतिमा कुठेही लावण्यात आली नाही असे लक्षात येताच आमदार अनिकेतभाई तटकरे यानी सभापती महोदय यांच्याकडे मागणी केली, व मागणी तत्काळ मान्य करित संबधीताणा कार्यवाहीसाठी आदेश दिले.त्यामूळे विधीमंडळाच्या सभागृहात लवकरच संभाजी राजांची प्रतिमा स्थापन होइल. थोर महापुरुषांनी केलेले कार्य आपल्या कायम स्मरणात रहावे त्यांची स्फुर्ती आपल्याला मिळावी याकरिता महापुरुषांच्या प्रतिमा सभागृहात लावल्या जातात. संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे सभागृहात काम करिताना नक्कीच उर्जा मिळेल अशा भावना आमदार अनिकेत तटकरे यानी व्यक्त केल्या.
आमदार अनिकेतभाई तटकरे यानी कोकण विधानपरिषद आमदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवखे असताना देखील पाहिल्या फेरीतच आपल्या कामाची चुणूक सभागृहात दाखवली कोकण वसियांना भेडसावनारे असंख्य प्रस्न त्यानी सभागृहात मांडले. अनेक विषय पोटतिडकिने उपस्तीत केले.मग तो मुंबई गोवा महामार्गाचा प्रस्न असेल,चक्रिवादळ, महाडचा पुर असेल शैक्षणिक अडचणी असतिल असे अनेक विषय सभागृहात उपस्तीत केले. त्यामूळे अनेक प्रस्न मार्गी लागत आहेत. सुनिल तटकरे यांनी पहिला महारास्ट्रात व आता दिल्लीत दबदबा निर्मान केला आहे. सत्ता नसताना मुंबई गोवा महामार्गा करिता 400 कोटी आणले हे सोपे नाही. परंतु कुठेतरी तटकरे यांच्या शब्दाला धार आहे. राजकिय कला आहे यवढे मात्र निश्चित आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत तसा दबदबा आमदार अनिकेत भाई चा तयार होताना दिसत आहे.
कोणी म्हणत असेल वडीलांचे पाठबल, ते तर सर्वानाच असते. पण स्वतामधे कार्य कर्तुत्व पण असावे लागते, ते कर्तुत्व आमदार अनिकेत तटकरे यांच्यामध्ये आहे, ते कर्तुत्व व गुण रायगड वसियांनी हेरले आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस च्या माध्यमातून त्यानी अनेक सामजिक व शैक्षणिक कामे हाती घेतली आहेत.
देशपातळीवरिल बॉडी बिल्डर स्पर्धा, संभाजी महानाट्य, पक्षाच्या भव्य दिव्य सभेतील देखणे नियोजन क्रिडा स्पर्धा, मेरोथोन, असे विविध कार्यक्रमाचे हटके नियोजन अनेकानी पाहिले त्यामूळे रायगड च्या राजकारणात सुनिल तटकरे यांच्या प्रमाणे अनिकेत व आदिती हे दोघेजण नक्किच राजकिय वादळ तयार करतील यवढे मात्र निचित. राजकारणात सातत्याने घडामोडी घडत असतात.राजकिय संघर्ष हा पाचविलाच पुजलेला असतो याची जाणीव आमदार अनिकेतभाई तटकरे याना असल्याने आपल्या संयमी गुणाच्या जोरावर ते अनेक राजकिय वादळे ते लीलया परतून लावतील व आमदार म्हणून साजेशे काम करतील असा विश्वास अनेकजण व्यक्त करित आहेत.
तर अशा कर्तुत्वान युवा नेत्याला आगामी काळात पेण मतदार संघात जनतेची सेवा करण्याची संधी कोणी रोखू शकणार नसल्याचे संकेत पेण मतदार संघात संघातील राष्ट्रवादीच्या वाढत्या प्राबल्यावरुन दिसून येत आहे.
Comments
Post a Comment