कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या वतीने भव्य कुणबी समाज मेळावा,व विद्यार्थी गुणगौरव सोहळा,ओबीसी प्रवक्ते सुनील देवरेंचे घडणार विद्यार्थी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन

कोलाड ( श्याम लोखंडे )कुणबी समाजन्नोती संघ मुबंई संलग्न ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड विभागाच्या वतीने भव्य कुणबी मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवारी 28 मे रोजी सायं ठीक 4 वाजता आयोजित करण्यात आले असून यावेळी ओबीसी प्रवक्ते तथा शिवसंस्कार प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा प्रा.सुनील देवरे यांचे समाज बांधव तथा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन घडणार आहे अशी माहिती देत यासाठी कोलाड विभागातील सर्व कुणबी बांधवांनी व गुणवंत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोलाड ग्रुप विभागीय अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी केले आहे. 

कोलाड कुणबी समाज ग्रुप विभागाच्या वतीने भव्य कुणबी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित आंबेवाडी येथील मराठा पॅलेस चा बाजूला व घोणेमिल शेजारी या मेळाव्याचे व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रसंगी शिव व्यख्याते व ओबीसी प्रवक्ते शिवश्री सुनील देवरे यांचे समाजाला तसेच विद्यार्थी वर्गाला विशेष मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे समाज एकसंघ व संघटित राहून त्याच्या सर्वांगिक विकास झाला पाहिजे त्याच बरोबर इयत्ता दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य पातळी गाठली गाठली पाहिजे तसेच त्यांना विविध शिक्षण विषयावर देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे.

यावेळी समाज नेते शंकरराव म्हसकर माजी अध्यक्ष उच्चाधिकार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, सुरेश मगर अध्यक्ष  रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती जनमोर्चा ,शिवराम शिंदे अध्यक्ष रोहा तालुका कुणबी समाज ग्रामीण शाखा ,शिवराम महाबळे रायगड समन्वय समिती, प्रा.माधव आग्री मुबंई तालुकाध्यक्ष, डॉ सागर सानप उपाध्यक्ष कु.यु.मंडळ मुबंई राजेशशेट सानप माजी सभापती कृ.उ.बा.स. रोहा ,मोतीरामशेट तेलंगे मा. सभापती पं. स. रोहा,सौ. सुनिताताई सुरेश महाबळे मा. सभापती पं.स. रोहा डॉ. श्री. मंगेशजी सानप मा. उपाध्यक्ष कु. यु. मंडळ मुंबई,सौ. चेतनाताई चंद्रकांत लोखंडे मा. सदस्या पं. स. रोहा, सौ. सिध्दीताई संजय राजिवले मा. पं. स. सदस्या रोहा,सुरेशदादा महाबळे सरपंच ग्रा. पं. आंबेवाडी,समिरजी महाबळे सरपंच ग्राम.संभे, विशाखा विजय राजिवले सरपंच ग्रा. पं. वसरगांव,देविदासजी पांडूरंग सानप,सौ. संजिवनी संतोष बाईत ,मराठी उद्योजिका सौ निलीमाताई राजेश कदम ,आशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कुणबी समाज नेते व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून हा भव्य दिव्य असा कुणबी समाज मेळावा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होणार आहे .

तसेच हा भव्य आणि दिव्य कुणबी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची जय्यत तयारी कोलाड विभागीय कुणबी ग्रुपचे सर्व पदाधिकारी यासाठी अधिक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog