पुगांव येथील सामाजिक कार्यकर्ते रविकांत शेळके यांचे दुःखद निधन
सामाजिक कार्यकर्ते कै. रविकांत शेळके
कोलाड-पुगांव (नंदू कळमकर)रोहा तालुक्यातील पुगांव गावचे रविकांत सदाशिव शेळके यांचे रविवार दि.०३/४/२०२२ रोजी दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षांचे होते.ते अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते.तर त्यांचा समाजकार्यात नेहमी सहभाग होता.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांचा मोठा भाऊ प्रभाकर शेळके व लहान भाऊ सुधीर शेळके हा समाज कार्यात नेहमी सक्रिय असून सुधीर शेळके हे पुगांव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व पुगाव गावचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत.सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली.त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा,सुना,पुतणे,नातवंडे व मोठा शेळके परिवार आहे.रविकांत शेळके यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.१२/४/२०२२ पुगाव येथील श्री क्षेत्र कमलेश्वर मंदिर शेजारील तलावावर होतील तर उत्तरकार्य विधी गुरुवार दि.१४/४/२०२२ रोजी त्यांच्या पुगांव येथील निवस्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment