गोवे येथे हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन 

 संग्रहित छायाचित्र 

     गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने शुक्रवार दि.१५/४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ६ ते ७ वाजता किल्ला व कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ९ ते ११ ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील खानावकर (खोपोली )यांची किर्तन सेवा, नंतर हरि भजनाचा कार्यक्रम होईल.

           तसेच शनिवार दि.१६/४/२०२२ रोजी दुपारी ३.०० पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी गावकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, सचिव श्रीधर गुजर, उपसचिव प्रवीण पवार, खजिनदार कमलाकर शिर्के, उपखजिनदार सुरेश जाधव, सदस्य बळीराम जाधव, राजेंद्र जाधव, शंकर दहिंबेकर, शांताराम घरट, नथुराम मांजरे, तसेच ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग, महिला मंडळ मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog