ओबीसी जनमोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी रोहाचे सुरेश मगर यांची 

तर

 सरचिटणीस पदी माणगाव चे अशोक पाटिल यांची एकमताने निवड

कोलाड नाका  (शरद जाधव) आपले अनेक वर्षाचे प्रस्न सोडवण्याकरिता संघटन महत्वाचे आहे.याची जाणिव ओबीसी समाजाला होत असुन त्या गतीने जिल्ह्यात संघटना कार्यरत असुन, सदर संघटना अधिक बळकट कशी होइल, संघटन चळवळ अधिक व्यापक गतिने कशी पुढे नेता येईल याकरिता तितक्याच ताकतीच्या लढाऊ नेत्याची गरज असताना रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचा एक बुलंद आवाज,अभ्यासू लढाऊ नेता सुरेशजी मगर यांची ओबिसी जनमोर्चा च्या रायगड जिल्हा आध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडी ने ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण तयर झाले आहे.

        सदर कार्यक्रम माणगाव येथील कुणबी सामाजिक सभागृहात घेण्यात आला होता. 

    यावेळी ओबिसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी  बावकर, सरचिटणीस अरविंद डाफळे, सचिव कृष्णा वने, राजकिय नेतृत्व अनिल नवगणे, नगराध्यक्ष पवार,कुणबी संघाचे सचिव आशोक करंजे, महिला मंडळा चे सचिव स्नेहा खापरे, जिल्हा समन्वयक उदय कठे, कुणबी समाज नेते शिवराम महाबळे महादेव सरसंबे डॉ सागर सानप, डॉ.मंगेश सानप,सचिन कदम,सुनिल ठाकुर,अनंत थिठे सर्व ओबीसी बांधव  उपस्तीत होते.

      रायगड जिल्ह्यामधे बहूसंख्यने ओबिसी समाज आहे. अणि या समाजाचे सामाजिक .राजकिय 

शिक्षण, आरक्षण .असे विविध प्रस्न सोडवण्या करिता ओबीसी जणमोर्चा ही संघटना सामजिक चळवळ म्हणून उभी राहात आहे.जिल्ह्यातील विविध प्रस्न संघटनेने हाती घेतले असुन शासंन दरबारी त्याचा पाठपुरावा सुरु आहे.

             सुरेशजी मगर हे वाशी सारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व आहे.अगदी शालेय जीवना पासुन समाजासाठी काही तरी करण्याची तलमळ त्याना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे  तरुणपनात सामजिक राजकिय संघटन उत्तम रित्या त्यानी केले  आहे. शिवसेना, कॉंग्रेस,  व आता राष्ट्रवादी पक्ष, ज्या पक्षात त्यानी काम केले त्या पक्षात त्यानी नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.म्हणूनच तर आजही जिल्ह्यात त्यांचे विविध पक्षांच्या नेते मंडळीशी मैत्री पुर्ण संबध आहे त्यांचा मित्र परिवार खुप मोठा आहे. 

          रोहा तालुक्यातील कुणबी संघटनेत तसेच मुंबई संघावर आपल्या अंगी असलेल्या वकृत्वाच्या जोरावर गेली अनेक वर्ष छाप पाडली आहे. असेच   काम भविश्यात ओबिसी संघटने साठी करण्या साठी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली आहे. एक स्वछ प्रतिमा असलेला निस्वार्थी चेहरा ओबिसी ला मिळाल्याने सुरेशजी मगर त्या पदाला सावजेशे काम करतील असा विश्वास अनेकांनी वेक्त केला.तर  त्यांच्या निवडीने संघटनेत नवचेतना तयार झाली असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना संघटनेच्या कामात अधिक चे बळ मिळेल हे या निवडी निमित्त दिसून आले तर त्यांची निवड होताच खासदार सुनिल तटकरे  पालकमंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यानी त्यांचे अभिनंदन केले.

     यावेळी जणमोर्चाच्या सरचिटनीसपदी अशोक पाटिल (माणगाव) उपाध्यक्ष प्रदुगन रसाळ,(तळा गवळी) उपाध्यक्ष सुरेश शंदे (माणगाव नाभिक)  सरचिटनीस रोषण पाटिल (रोहा आगरी) चिटनीस महादेव पाटिल (म्हसळा आगरी) तर कार्यकारिनी सदस्य म्हणून भास्कर पवार (रोहा) अरुण चाळके (माणगाव) सचिन कदम (रोहा) कृष्णा वाडेकर (तळा), महादेव सरसंबे (रोहा) रुपेश पाटिल (मुरुड)  विनायक शेडगे (मुरुड) रविंद्र मांडवकर (तळा) रामचंद्र सकपाळ (रोहा) अनंत खराडे (तळा) रत्नाकर लाबाडे (श्रीवर्धन) शंकर खाडे (माणगाव) यांची निवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog