शिवसेने तर्फे पाले बुद्रुक येथे जिल्हा स्तरीय भगवा चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

 संग्रहित छायाचित्र 

    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदान संघातील कोलाड विभाग कबड्डी असोसिएशनच्या पाले बुद्रुक येथील मैदानावर रविवार दि.१मे २०२२ रोजी संध्याकाळी ५ वा. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे रोहा तालुक्याचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने तर्फे जिल्हा स्तरीय भगवा चषक कबड्डीचे आयोजन करण्यात येणार आहे.

                  या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक ५१०००/- रु.व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक २५०००/- रु.व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक १५०००/- रु. व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक १५०००/- रु.व आकर्षक चषक, मालिकावीर सायकल, उत्कृष्ट पक्कड कुलर, उत्कृष्ट चढाई कुलर, पब्लिक हिरो टॉवर फँन अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी रमेश सानप ७८०९१२२९९९, मिलिंद पवार ९८६०२५०२८७, चंद्रकांत लोखंडे ९४२११६८०३३, ज्ञानेश्वर खांमकर ९९७५६८४७५३ यांच्याशी संपर्क साधावा.

                      सर्व कबड्डी स्पर्धा यशश्विकरण्यासाठी विभाग प्रमुख कुलदीप सुतार, कोलाड परिसरातील शिवसैनिक व सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog