परमेश्वराच्या नामचिंतनाने जिवन धन्य होते:-ह.भ.प.उदय बंद्री महाराज
कोलाड (विश्वास निकम ) हनुमंत राया ज्या अंजेनी मातेच्या उद्री जन्माला आले त्या अंजनी मातेने हनुमंत राय जन्माला येण्याच्या अगोदर भगवान शिवाची आराधना केली तेव्हा भगवान शिव म्हणजेच शंकर प्रसन्न होऊन अंजली मातेला सांगितले तुला काय वरदान पाहिजे त्यावेळी अंजली मातेने सांगितले ऐसा पुत्र व्हावा कि ज्याचा तिन्ही लोकी असेल झेंडा असा वर मागितला या वराप्रमाणे हनुमंत राय यांचे उपकार आहेत हे धन्य अंजनीच्या सूत l नाव त्याचे हनुमंत ll१ll याने सीता शोध केली l रामे सीता भेटविली ll २ll द्रोणागिरी तो आणियेला l लक्ष्युमन वाचवीला ll३ll ऐसा मारुती उपकारी l तुका लोळे चरणावरी ll या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आधारे ह.भ प.बंद्री महाराज यांनी व्यक्त केले
यावेळी गायनाचार्य रविंद्र मरावडे, किरण ठाकूर,गणेश दिघे,सुनिल भऊर राम महाराज आंबेकर, अनिल महाराज सानप,हरिचंद्र धामणसे,देवजी मरवडे,अक्षय ओव्हाळ, राजा म्हसकर,पुई महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग उपस्थित होते.या अगोदर श्री हनुमान जयंती निमित्ताने सकाळी श्री सत्यनारायणाची पूजा, नंतर ज्ञानेश्वरीचे ९ व्या व १२ व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण, व संध्याकाळी ७ वा महादेववाडी, वरसगांव व कोलाड पंचक्रोशी यांचा हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी रायगड भुषण राम महाराज आंबेकर,रायगड भुषण पत्रकार विश्वास निकम,राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार रविंद्र लोखंडे, रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार प्राप्त नंदकुमार मरवडे,संजय गांधी निराधार योजना कमिटीवर निवड झालेले संजय मांडूळस्कर यांचा सत्कार जय हनुमान संस्कृतिक क्रीडा मंडळ पुई क्षेत्रपाल मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पुई यांच्या तर्फे करण्यात आला.
सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी रोशनी लहाने उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या वृषाली मांडळुस्कर, विठ्ठल पवार, संजय मांडळुस्कर,अनंत सानप,प्रविण धामणसे,राकेश महाडिक,दिनकर सानप, शरद दिसले,सुनिल दळवी,चंद्रकांत लहाने,उदय कदम,बबन दळवी,दर्शन मांडळुस्कर,सुरेश सावरकर,सुभाष भुरूक, तसेच क्षेत्रपाळ मित्र मंडळ पुई,ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ,जय हनुमान संस्कृतिक क्रीडा मंडळ पुई यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment