निगुडशेत प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न

कोलाड (श्याम लोखंडे ) तळा तालुक्यातील प्राथमिक शाळा निगुडशेत येथे शाळा पुर्वतयारी मेळावा मोठ्या उस्ताहात संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन कमेटीच्या नुतन अध्यक्षा सौ संगीता संदीप मंचेकर. यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.शाळेय कामकाजाचा आढावा देताना मुख्याध्यापिका गवळी यानी संगितले की या पुर्व तयारी मेळाव्यात कु विषयराज रामदास मोरे, कुमारी दिया देवजी सरफळे या दोन मुलांचा शाळेत प्रवेश झाला आहे. शाळेची पटसंख्या शासणाच्या निकषानूसार वाढविने गरजेचआहे .बहुसंख्य ग्रामस्थ हे नोकरीनिमित्त बाहेर गावी असल्याने मुलेही बाहेरगावी आहेत. शालेत मुळे वाढावी याकरिता ग्रामस्थ, व्यवस्थापन कमेटीने लक्ष घालने गरजेचे आहे असे मुख्याधिपीका शिक्षिका   गवळी यानी आपले मत व्यक्त केले

तर यावेळी विचार व्यक्त करताना  व्यवस्थापन समितीचे शिक्षण सल्लागार सदस्य पांडूरंग सरफळे (रावसाहेब) यानी मराठी शाळांची दिवसेंदिवस परिस्थीथी गंभीर होत चालली आहे.अनेक जन नोकरी निमीत्त कुटुंबीया सोबत बाहेरगावी असल्याने गावातील शाळा ओस पडत आहेत. निगुडशेत शाळेच्या हद्दित निगुडशेत गाव, बौधवाडी, आदिवासी वाडी, किस्तकेतके या भागासाठी सदर शाळा आहे. या चारी ठिकाणची लोकसंख्या जवळपास 1500  आहे त्यामूळे मुख्याध्यापक शिक्षक यानी या ठिकानी गावातिल कुटुंबीयाशी सम्पर्क साधून बाहेर गावी किती कुटुंब रहातात त्यातील पात्र मुळे किती गावात किती मुळे आहेत याची माहिती घेउन शाळेय कमेटीला किवा ग्रामस्थाना माहिती द्यावी.व मुलांचा शिक्षनाबरोबर बौधिक विकास व्हावा याकरिता शालेय तक्ते, बोर्ड, व थोर वेक्तीची माहिती शाळेत लावण्यात यावी अशी सुचना सरफळे यानी केली   द  संगीता संदीप मंचेकर  ग्रामपंचायत सदस्या अनिता सरफळे व ग्रामस्थ उपस्तीत होते .

Comments

Popular posts from this blog