कोलाड मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत,
ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी यांच्यासह टु व्हीलर स्वार यांच्या जिवाला धोका
गोवे-कोलाड (विश्वास निकम )मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड आंबेवाडी नाका येथील बाजारपेठेच्या ठिकाणी दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून या भटक्या कुत्र्यांच्यामुळे जेष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी, यांच्या सह टुव्हीलर स्वार यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा हायवे वरील कोलाड (आंबेवाडी नाका) हे ठिकाण बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असून येथे आजूबाजूच्या ६० ते ६५ खेडेगावातील नागरिक बाजाराकरिता येजा करीत असतात.तसेच या परिसरात शाळा,कॉलेज,असल्यामुळे हजारो विद्यार्थी ही येजा करीत असतात. तसेच या महामार्गवर कामावर जाणारे असंख्य टुव्हीलर स्वार ये जा करीत असतात.यातच या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असून या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी एक मेकांच्या मागे सैरा वैरा पळत असतात.व टुव्हीलर स्वार यांच्या समोर येऊन धडकतात व अपघात होऊन अनेकवेळा टुव्हीलर स्वार जखमी होत आहेत.
तसेच येजा करणारे जेष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी यांच्या अंगावर धावून जात आहेत. यामुळे या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक पूर्णपणे हैराण झाले आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर दररोज कोठे ना कोठे तरी भटके कुत्रे अवजड वाहनाखाली येऊन चिरडले जात आहेत.यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
Comments
Post a Comment