अंगणवाडी सेविका सौ. स्मिता लाड यांचे आकस्मित निधन

खांब-पुगांव (नंदु कळमकर ) रोहा तालुक्यातील हेदवली गावच्या सासरवासिन व वरवडे पाले येथील सुकन्या तथा अंगणवाडी सेविका सौ स्मिता श्रीनिवास लाड यांचे मंगळवार दि.५ एप्रिल रोजी आकस्मित दुःखद निधन झाल्याने लाड व खांडेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर तर हेदवली व वरवडे पाले गावावर शोककळा पसरली आहे. 

३५ वर्षीय होतकरू आणि उच्च शिक्षित कर्तबगार महिला ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण निमशासकीय सेवेत असल्याने त्या आपल्या माहेरील वरवडे पाले येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.तसेच त्या सेवेत असल्यामुळे तेथेच आपल्या परिवरसमावेत आपल्या त्या वास्तव्याला होत्या. त्या कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्या असता विहिरीला कठडे नसल्यमुळे विहिरीत तोल गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अत्यन्त प्रेमळ स्वभाव सर्वांना परोपकारी पडणाऱ्या तसेच महिलांसाठी त्या बचत गटाचा प्रतिनिधित्व करत अनेक बचतगट तयार करून त्यांना सदैव मार्गदर्शन करत होत्या.

          त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, सासरे, एक मुलगी एक मुलगा, व मोठा लाड व खांडेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि.१४ एप्रिल तर उत्तरकार्य विधी रविवार दि.१७ एप्रिल रोजी त्यांच्या हेदवली येथील निवास्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog