ऐनघर ग्रामपंचायत अपहराची चौकशी करण्याचा लेखी पत्र दिल्यानंतर लाक्षणिक संप मागे,परंतु आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढू:- ज्येष्ठ  कार्यकर्ते महादेव मोहिते

गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील श्रीमंत समजली ऐनघर ग्रामपंचायत मध्ये सन २०१८ ते २०१९,२०१९ ते २०२० व २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात १४ वा वित्त आयोग व जनरल फंडातून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाला असल्याची माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्राच्या आधारे निदर्शनास आल्याने माजी सरपंच तथा शेकापचे जेष्ठ नेते महादेव मोहिते यांनी दि.२१/९/२०२०रोजी व ऐनघर ग्रामीण बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश देवराम कातकरी यांनी दि.३/९/२०२०रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन येथे अपहाराची चौकशी करावी असा अर्ज दाखल केला होता. परंतु त्याची कोणतेही चौकशी न झाल्यामुळे पुन्हा मंगळवार दि.२२/३/२०२२ रोजी पंचायत समिती रोहा येथे लाक्षणिक उपोषण पुकारला होता.नंतर जी. एल.वायल चौकशी अधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांनी लेखी पत्राच्या आधारे सांगितले कि लाक्षणिक उपोषण करून नये तुम्ही सादर केलेला लेखिपरीक्षण अहवाल सात दिवसाच्या आत रायगड जिल्हा परिषद यांच्या कडे देण्यात येईल.त्यानंतर ११ ते ५ वाजेपर्यंत एक दिवशीय लाक्षणिक उपोषण हे दुपारी १ वाजता यावंउपोषणाची सांगता करण्यात आली.              

सदर यापूर्वी ऐनघर ग्रामपंचायती मध्ये मोठया प्रमाणात अपहार झाला होता. यावेळी येथील माजी सरपंच व सदस्य यांना चौकशीत आरोपी ठरवत गुन्हा दाखल झाला होता.हे सदर सुरू असतांना देखील आज कोट्यावधीचा अपहार झाला असून स्थानिक परीक्षक यांनी लेखा परीक्षण करूनही रोहा पंचायत समिती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यासाठी विलंब करीत आहेत असा भेदभाव का? असा प्रश्न शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते व बेरोजगार संघटनेने उपस्थित केला करत आमचा हा लढा आम्हाला न्याय मिळवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढू अशी माहिती  ज्येष्ठ  नेते महादेव मोहिते यांनी दिली.

    रोहा पंचायत समिती अधिकारी जी एल वायल यांनी लेखी पत्र दिल्यानंतर शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव मोहिते, ऐनघर बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी, प्रफुल कणखरे, विवेक हरपाल, दिनेश कदम, नवनाथ बर्जे, मंगेश लाड, अतुल भिल्लारे, दत्ताराम तेलंगे, चिंटू पवार, धर्मेंद्र सिद यांनी सांगितले कि आम्ही जरी आता लाक्षणिक उपोषण मागे घेत असलो तरी आम्हांला न्याय मिळेपर्यंत तसेच शेवटच्या स्वासापर्यंत आम्ही लढू असे ठणकावत सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog