विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार, महागाईत भरीत भर म्हणून अतिरिक्त सुरक्षा रकमेच्या नावाखाली विज ग्राहकाला दोन बिले

 जनतेतून तीव्र संताप!

  गोवे-कोलाड (विश्वास निकम) या अगोदरच महागाईच्या आगीत जनता पूर्णपणे होरपळत असतांना यात भरीत भर म्हणून विज वितरण कंपनी कडून मार्च महिन्यात विज ग्राहकांना दोन बिले देण्यात आली असून एक बिल मिटर रिडींग प्रमाणे आहे तर दुसरा बिल अतिरिक्त सुरक्षा ठेव या नावाखाली देण्यात आला आहे. जर रिडींग प्रमाणे ५००/- रु. असेल तर अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल हा ५००/-रु देण्यात आला आहे म्हणेजच विज ग्राहकाला एकूण १०००/- रु. भरावे लागणार आहे. अशी लूट विज वितरण कंपनी कडून सुरु केली आहे.

              दहा वर्षांपूर्वी विज ग्राहकाला लाईट बिल हा दोन महिन्यातून एकदा येत होता व केव्हा लाईट जात नव्हती. कोणताही भारनियम नव्हता.आता वारंवार लाईट ही खंडित केली जात आहे. व प्रत्येक महिन्याला येणारा लाईट बिलाची रक्कम ही दुप्पट झाली आहे. अगोदरच भरमसाठ येणाऱ्या लाईट बिलाने जनतेचे कंबरडे मोडले आहे यात भरीत भर अतिरिक्त सुरक्षतेच्या नावाखाली दुसरा बिल आल्यामुळे विज ग्राहकांची झोप उडाली आहे.

              दोन वर्षा पासून कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाया लागल्या आहेत नंतर निसर्ग चक्री वादळ यातून सावरता असतांना पेट्रोल, डिझेल,स्वयंपाक गॅस,खाद्य तेल यांच्या किंमती वाढल्यामुळे लोकांना जिवन जगणे असाह्य झाले आहे.तर एक महिन्याचा बिल भरला नाही म्हणून गोरगरीब जनतेची त्वरीत लाईट कट केली जाते. पण लाईट गेल्या नंतर याची तक्रार नोंदवून ही तीन-चार दिवस लाईट सुरु केली जात नाही.नवीन मिटर घेतांना मिटरची रक्कम घेतली जाते मग अतिरिक्त सुरक्षेच्या नावाखाली दुसरा बिल का दिला जातो असा प्रश्न विज ग्राहकांकडून केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog