रोहा पाण्यासाठी तळाघर बौद्धवाडी ग्रामस्थांचा मंगळवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
पाण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन!
मंत्र्यांच्या गावात पाणी टंचाई!
कोलाड (श्याम लोखंडे ) रायगड जिल्ह्यात तसेच पालकमंत्री यांच्या गावात तसेच दस्तुरखुद्द त्यांच्या मतदारसंघात आता नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाण्यासाठी कायम वंचीत राहणाऱ्या तळाघर रोहा बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी अखेर यासाठी मंगळवारी निषेध मोर्चा काढला. रोहा एसटी स्टँड ते तहसील कार्यालयावर मोर्चेकरांनी धडक देत रोहा तहसीलदार यांना याबाबत निवेदन देत समक्ष माहिती दिली. प्रसंगी संतप्त मोर्चात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा जोरदार उदो उदो करीत समाचार घेतला.पाणी चोरणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत संतप्त मोर्चेकरांनी पालकमंत्र्यांनाही सोडले नाही तर मानवी जीवनाला पुरेसा पाणी पुरवठा करा अशी आग्रह मागणी या निषेधार्थ निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली.
रोहा तळाघर ग्रामपंचायतीत आतापर्यंत अनेक पाणी योजना राबविल्या. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी देखील खर्ची पडला. प्रत्यक्षात योजनेची कामे निकृष्ट झाल्याने तळाघर, बोरघर, बौद्धवाडीला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. बौद्धवाडीतील महिलांना पाण्यासाठी अर्धाकोस दूर जावे लागते,तर डोक्यावरील कमरेवर येणारा पाण्याचा हंडा गेला कुठे अखेर महिलांना तासंतास पाण्यासाठी ताटकळत राहावे लागते, हे भयान वास्तव या मोर्च्यातुन व निषेधातुन समोर आले आहे . त्यातून व्यक्त झालेला त्रागा, हक्काचा लढा काय आहे,हे येथील बहुसंख्येने महिला ग्रामस्थांनी दाखवून दिले .
तर संतप्त महिलांनी यावेळी पाण्यावाचून वंचीत ठेवणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो तसेच आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी केली.यासाठी शेतकरी कामगार पक्ष,वंचित बहुजन आघाडी,बौद्ध युवा संघ,भारतीय बौद्ध महासंघ,बौद्ध पंचायत समिती आशा विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या,
Comments
Post a Comment