राजिप शाळा गोवे येथे शाळापूर्व तयारी मेळावा मोठया उत्सहात संपन्न
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील राजिप.शाळा गोवे येथे बुधवार दि.२०/४/२०२२रोजी शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन मोठया उत्सहात संपन्न झाले.यावेळी गोवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजिता जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, उपाध्यक्ष प्रदीप पवार,अंगणवाडी सेविका सौ.सुजाता जाधव,मदतनीस सौ.अल्का जाधव, महेंद्र जाधव, गावातील सर्व जेष्ठ नागरिक,तरुण वर्ग,महिला मंडळ उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात लेझीम, ढोल आणि ताशांच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये सर्व दाखल पात्र विद्यार्थी, इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व विद्यार्थी तसेच माता -पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक जयेश महाडिक सहशिक्षिका श्रीम. रंजना गांधारे मॅडम यांनी शाळेमध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक प्रदर्शनाचे स्टाॅल उभारून विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक आणि भाषिक ज्ञान मिळावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी गावातील सर्व तरूण युवक -युवती ने स्वयंसेवक बनून सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाडिक सर तर प्रास्ताविक आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सहशिक्षिका श्रीम रंजना गांधारे मॅडम यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री. महाडिक सरांनी मानले.
Comments
Post a Comment