जय मल्हार धनगर समाज जय मल्हार सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा 23 एप्रिलला होणार
रायगड (महेश झोरे) जय मल्हार धनगर सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीने सालाबादा प्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मु.धामणसई धनगरवाडा, ता. रोहा, जि. रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे धनगर बांधवांना व युवा पिढी साठी नवीन योजनेचे नियोजन व अंमल बजावणी पहिल्यांदा करण्यात येणार आहे. याचा पुरपुर फायदा धनगर बांधवांनी व युवा पिढीने घ्यावा. युवा पिढी साठी पोलीस भरती एम.पी.एस.सी / यु.पी.एस.सी स्पर्धा विषयी मार्गदर्शन करियर, पशू संवर्धन किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेच्या विषयी मार्गदर्शन , वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने विषयी मार्गदर्शन, तांडावस्ती सुधार योजना विषयी मार्गदर्शन, समाजात राबवणाऱ्या धनगर योजने विषयी मार्गदर्शन, या सर्व विषयाचे मार्गदर्शन हे उच्च पदावर असलेले आधिकारी देणार आहेत. याचा अर्थ आपल्याला खूपच मोलाचे मार्गदर्शन ठरणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ धनगर बांधवांनी व युवा पिढीने घ्यावा अशी जय मल्हार सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व धनगर बांधवांना व युवा पिढीला विनंती आहे.
Comments
Post a Comment