शेकाप नेते आ. जयंतभाई पाटील यांची पुगांव येथे सांत्वनपर भेट

 कार्यकर्त्याच्या दुःखात समरस होणारे एकमेव सच्चे नेते आ.जयंतभाई  पाटील जनतेत चर्चा            

पुगांव-कोलाड (नंदु कलमकर ) रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावातील तीन कुटूंबातील व्यक्ती मयत झालेल्या कुटुंबात व त्यांच्या दुःख अश्रू सावरण्यासाठी शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जयंतभाई पाटील यांनी शनिवार दि.९/४/२०२२ रोजी सांत्वनपर भेट घेतली.

              रोहा तालुक्यातील काही दिवसापूर्वी तसेच आ पाटील यांचे हितचिंतक पुगांव येथील नारायण शंकर खांमकर, रविकांत सदाशिव शेळके, विमल रामचंद्र देशमुख यांचे आकस्मित निधन झाले त्या प्रित्यर्थ या तिन्ही कुटूंबातील व्यक्तींच्या घरी जाऊन शेकापचे नेते तसेच आमदार जयंतभाई पाटील यांनी सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले.

 यावेळी पुगांव गावचे जेष्ठ नेते नारायणराव धनवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हसकर, बबन म्हसकर, खांब विभागीय नेते मारुती खांडेकर सर रोहा तालुका चिटणीस राजेश सानप,माजी सरपंच मनोहर महाबळे, नारायणराव अधिकारी, जनार्दन खामकर, महादेव खामकर, आनंता खामकर, रुपेश अधिकारी, आनंता धाडसे, विनायक म्हसकर व समस्त पुगांव ग्रामस्थ यांच्या समवेत उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog