लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्या मोफत नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
18 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,
खांब (नंदकुमार कळमकर )लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग , समता फाऊंडेशन मुबंई,व निलिकॉन फूड्स डाइज लिमिटेड धाटाव रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने व लायन्सक्लबचे मार्गदर्शक तथा चेअरपर्सन लायन रविंद्र घरत यांच्या विशेष मार्गदर्शनातून ग्रुप ग्राम पंचायत खांब व ग्रामस्थ महिला मंडळ खांब यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन राजिप शाळा खांब येथे करण्यात आले होते .
सदरच्या आयोजित शिबिराला येथील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतीसाद लाभला यात बहुसंखे रुग्णांची मोफत तपासणी व प्राथमिक उपचार करण्यात आले तर 18 गरजू रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली . यावेळी अध्यक्ष डॉ सागर सानप, लायन्सक्लबचे चेअरपर्सन लायन रविंद्र घरत,लायन्सक्लब ऑफ कोलाड चे प्रमुख मार्गदर्शक पराग फुकणे,निलिकॉन लिमिटेडचे एच आर मॅनेजर गजानन बामणे ,कोलाड लायन्सक्लब चे सचिव रविंद्र लोखंडे, खजिनदार डॉ श्याम लोखंडे, उपाध्यक्ष प्रो.माधव आग्री, डॉ मंगेश सानप,ग्राम पंचायत सरपंच सौ मानसी चितळकर, उपसरपंच मनोज शिर्के,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र चितळकर,वसंतराव मरवडे,ग्राम पंचायत सदस्य योगेश धामणसे,दत्तात्रय वातेरे,महेश चितळकर,बोर्ड ऑफ डायरेक्टर लायन डॉ विनोद गांधी,अनिल महाडिक,अलंकार खांडेकर, कल्पेश माने,विजय गोतमारे, महेश तुपकर ,राजेंदर कोप्पू,भरत महाडिक,नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,नितेश शिंदे,सौ पूजा लोखंडे लायन हेल्थ फाऊंडेशन अलिबागचे डॉ अनिरुद्धव,ऋतुजा,श्रद्धा,कमलाकर,गांधी पॅथॉलॉजीक येथील कोलाड आंबेवाडी च्या टेक्निशियन नूतन सानप ,अश्विनी जांभळे,आदी ग्रामस्थ नागरिक तपासणीसाठी आलेले रुग्ण बहुसंख्येने उपस्थीत होते
लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या वतीने मोफत आयोजित केलेल्या नेत्र तपासणीसाठी लायन्सक्लब चे चेअरपर्सन लायन रविंद्र घरत यांच्या व निलिकॉन कंपनी यांच्या सौजन्याने गरजूंनवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तर कोलाड रोहा लायन्सक्लब चे अध्यक्ष डॉ सागर सानप,मार्गदर्शक पराग फुकणे,रविंद्र घरत,उपसरपंच मनोज शिर्के,यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले तर हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन कल्पेश माने,अलंकार खांडेकर, खांब ग्राम पंचायत सह मंडळातील पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment