ग्रुप ग्रामपंचायत काकडशेतचा शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठीचा अनोखा उपक्रम
तळा (कृष्णा भोसले) ग्रुप ग्रामपंचायत काकडशेतने १५वित्त आयोगाने ग्रामपंचायत हद्दीतील गौळवाडी ,कळसांबडे,अडनाळे तथा काकडशेत शाळेला सौरपॅनल दिले.आणि शाळेच्या व्यवसायिक वीजबिल आकाराच्या समस्येची दखल घेतली.सरपंच मान.श्रीम.नीनाताई खेडेकर मॅडम.उपसरपंच सौ.अर्चनाताई तापकीर सचिव श्री.उमाजी माडेकर तथा समस्त य्रामपंचायत सदस्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत.आहे.सौरपॅनलचा उदघाटन तथा लोकार्पन सोहळा दि.९/3/2022 रोजी राजिप शाळा. कळसांबडे येथे पार पडला.. मर्यादित क्षेत्रातील अमर्याद कामाबद्दल मुख्याध्यापिका सौ.उल्का उमाजी माडेकर यांनी आभार मानले..कळसांबडे शाळेतील दर शनिवारी राबवली जाणारी धावती सफाई व सुखाकचरा संकलन स्वच्छ भारत आभियान या पुरक उपक्रमाच्या समन्वयक श्रीम.हर्षाली रकीबे/काळे मॅडमचे ग्रामपंचायती मार्फत कौतुक करण्यात आले.
.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य.सौ.लक्ष्मी दिवेकर मॅडम,श्री.शिंदे साहेब,श्री.मंगेशजी काप,श्रीमती.वंदना केळकर मॅडम,श्रीम.साळवी मॅडम,श्री.संदिप जामकर विस्तार अधिकारी तळा शिक्षण विभाग,तथा कळसांबडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेश मोरे आणि समस्त शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment