आदिवासी एकता मित्र मंडळाच्यावतीने
महिला सक्षमीकरण विभागाच्या विद्यमाने,
जागतिक महिला दिनी श्रीमती प्रतिभा हिलीम यांचा नारीशक्ती सन्मान पुरस्काराने गौरव!
पालघर( प्रतिनिधी) आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वतीने तसेच महिला सक्षमीकरण विभागाच्या विद्यमाने जागतिक महिला दिनी आपल्या ज्ञानाचा उपयोग फळाचीही अपेक्षा न करता गोरगरिबांसाठी करणाऱ्या श्रीमती प्रतिभा पांडुरंग हिलीम मु. कऱ्हे तलावली ता.विक्रमगड जिल्हा पालघर यांना नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीमती प्रतिभाताई हिलीम ह्या उत्कृष्ठ हाडाच्या शिक्षिका असून मध्यंतरीच्या आजारपणामुळे त्यांचे दोन्ही पाय व दोन्ही हात काढावे लागले आणि त्यांना कायमचे शारीरिक अपंगत्व आले पण त्यांच्यावरओढवलेल्या या संकटाला न घाबरता न जुमानता त्यांनी तेव्हढ्याच उमेदीने या संकटावर मात करून पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या मनोबलावर उभ्या राहून गोरगरीब मुलांना आपल्या शिक्षणाचा उपयोग करून देत राहिल्या आहेत त्याबद्दल आदिवासी एकता मित्र मंडळाच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना आज नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे, सचिव किसन भुयाळ,महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख संचीता जनाठे , सुनंदा किरकिरा सुरेखा कासट,सुनीता गोवारी, दिव्या खांडेकर, कल्पना पाडोसा, उर्मिला गुजर, नदिनी गोवारी , शालू दांडेकर, बबिता दांडेकर,जगन्नाथ हिलिम,कैलास वाडू,महेश भुतकडे आदी उपस्थित होते
श्रीमती प्रतिभाताईंना दिलेल्या नारीशक्ती सन्मान पुरस्काराबद्दल त्यांचेवर संपूर्ण पालघर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment