माणगाव दहीवली कोंड येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश पालकर यांना मातृशोक!

 कै. सुमित्रा लक्ष्मण पालकर

 माणगाव (प्रतिनिधी) माणगाव तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा गोरगरीब आदिवासी बहुजन समाजाच्या हाकेला सदैव धावून जाणारे दहीवली कोंड ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश लक्ष्‍मण पालकर यांच्या मातोश्री कै. सुमित्रा लक्ष्मण पालकर वय वर्षे ६५ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. कै. सुमित्रा पालकर यांच्या पश्चात राजेंद्र पालकर, योगेश पालकर, जितेंद्र पालकर, नंदकिशोर पालकर, अशी चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचे दशक्रिया विधी २६ मार्च शनिवार रोजी दहीवली कोंड पालकर वाडी येथे आहे तर उत्तर कार्य दि.२९ मार्च मंगळवार,रोजी दहीवली कोंड पालकरवाडी या राहत्या घरी होणार आहेत.

 अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या कै. सुमित्रा पालकर यांच्या निधनाने पालकर परिवारामध्ये तसेच मोर्बा, दहिवली, पंचक्रोशी मध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog