जिद्दआणि चिकाटीला प्रयत्नांची धार!
सुवर्णा पाटील झाली पीएसआय!
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
एमपीएससी परीक्षेत उपनिरीक्षक पदी निवड झालेली कु. सुवर्णा बाळू पाटील |
कोलाड (विश्वास निकम) संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्या मध्ये क्षमता असते व त्याग आणि परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही हे वाक्य सत्यात उतरवणारी आंबेवाडी नाका येथील राहणारे जे. बी. पाटील सर यांच्या भावाची मुलगी मूळ गाव नेवाडे ता.सिंदखेडा येथील कु.सुवर्णा बाळू पाटील यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे
कु. सुवर्णा बाळू पाटील हिने एम.पी. एस. सी परीक्षा २०१९ रोजी दिली होती.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये सिंदखेडा तालुक्यातील सुवर्णा हिने ओबीसी गटातून २१ वा क्रमांक मिळवून तिची महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.तीचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत परंतु मी माझ्या मामाच्या सहकार्यामुळे मी एवढी भरारी घेऊ शकलो असे मत पत्रकारांशी बोलताना सुवर्णा हिने व्यक्त केले आहे
तीच्या अभ्यासपुर्ण मेहनतीला यश आले असून त्यांच्या नेवाडे गावात पहिलीच मुलगी पी. एस. आय.पदाकरता नियुक्ती झाल्याबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.त्यांच्या कुटूंबात व समाजात प्रेरणादायी गोष्ट ठरली असल्याचे संपूर्ण तालुक्यासह त्यांच्या पुर्ण गावात आनंदाचे वातावरण असून कठीण परिस्थितीत स्वतःचे ध्येय न विसरता यशाचे शिखर गाठणाऱ्या सुवर्णाचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment