तळा तालुक्यातील मेढा आदीवासीवाडीवर कातकरी उत्थान अंतर्गत दाखले वाटप व आरोग्य शिबीर संपन्न
तळा(कृष्णा भोसले )तळा तालुक्यातील मेढा आदि वासीवाडीवर जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांचे आदेशाने प्रांताधिकारी वैशाली दिघावकर आणि तहसीलदार अण्णापा कनशेट्टी यांचे मार्गदर्शनाखली कातकरी उथान कार्य क्रमांतर्गत सप्त सुत्री अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना विविध दाखले वाटप सातबारा उतारा वाटप त्याचबरोबर आरोग्य तपासणी करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला सरपंच मधुकर वारंगे नायब तहसीलदार स्मिता जाधव मंडळ अधिकारी विनायक सुतार मेढा सजाचे तलाठी प्रवीण महाडिक कोतवाल बाळाराम पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले जातीचे दाखले २७ ई श्रम कार्ड ६८ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस बाबर, अमोल देशमुख यांचे मार्गद्शनाखाली आदिवासी बांधवांची तपासनी करण्यात आल्या त्यामध्ये रक्त तपासणी ३० तपासण्या नागरिकांच्या करण्यात आल्या असून अनेक विविध तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.
Comments
Post a Comment