कोणत्याही व्यक्तीने अन्याया विरुद्ध लढायचे असेल तर शिवबा सारखे लढा, छत्रपतींचे विचार आत्मसात करा:- साक्षी दीदी ढगे पाटील
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) कोणतही व्यक्ती स्त्री असो या पुरुष या दोघांनीही अन्याया विरुद्ध लढायचे असेल तर शिवबा सारखे लढा,त्यांचे विचार आत्मसात करा तरच तुमचे जिवन सार्थ ठरेल छत्रपती शिवरायांचे खरे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यानकार कु. साक्षी दीदी ढगे पाटील (नाशिक) यांनी शिवजयंती निमित्ताने गोवे येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील मौजे गोवे येथील शिवजयंती उत्सवाच्या निमित्त जय हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात त्या प्रमुख शिव व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या .एखाद्याने ताईनो तुम्हांला कोणी हात लावला तर आईग न करता त्याला त्याचा बाप आठवला पाहिजे अशीच अद्दल घडवा.तलवारी पेक्षा अधिक तीक्ष्ण नजरेची धार तुला भवानीचा वारा आहे. भगव्याची रक्षणी तु स्वराज्याची लेक आहेस. दुबली समजू नकोस स्वतःला तुही जिजाऊची लेक आहेस.एकच राजा होऊन गेला कि त्याच्या दरबारात एकही नृत्यगणा नाचलेली नाही कारण त्यांनी स्त्रीला देवता समान मानली होती ते म्हणजेच आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी राजे होते.
आज तरुणांनानी शिवजयंती उत्सवात डॉलबी डीजे लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच आजच्या तरुण वर्गाला माझे असे सांगणे आहे कि ज्या स्त्रीने तुमच्या नावाच्या बांगड्या,मंगळसूत्र तुमच्या नावाचे कुंकू लावले आहे.तिनेच मुलाला जन्म दिला आहे. पण नाव तुमचेच दिले आहे. ज्याला बाईतली ताई कळली तोच मुक्ताईचा ज्ञाना झाला,ज्याला पत्नी कळली तो सितेचा राम झाला, ज्याला सखी कळली तो श्याम झाला, ज्याला आई कळली तोच जिजाऊचा शिवबा झाला.सर्वाना समान तसेच रयतेसाठी सदैव लढणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आशा या थोर युग पुरुषाचे पुर्ण शिवचरित्र व्याख्यानकार कु.साक्षी दीदी ढगे पाटील हिने आपल्या मनोगतातून युवकांपुढे व्यक्त केला.
मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात व उत्स्फुर्तपणे व प्रतिसाद लाभलेल्या तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ गोवे यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाचा पाचवा वर्षे असून हा कार्यक्रम मोठया उत्सहात संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव,रायगड भूषण विश्वास निकम,माजी उपसरपंच नितीन जाधव, संदीप जाधव,सदस्या निशा जाधव,रंजिता जाधव,गोवे-खांब ग्रामीण क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,भरत जाधव,यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी जेष्ठ नेते तानाजी जाधव,नामदेव जाधव, संदीप जाधव,राजेश शिर्के मनोहर मांजरे, कमलाकर शिर्के, सुरेश जाधव,राजा जाधव, लिलाधर दहिंबेकर,रामचंद्र पवार,रामभाऊ जाधव, सुरेश जाधव,बळीराम जाधव,नितीन जवके,पांडुरंग जाधव,महेंद्र जाधव,नंदा जाधव,नंदकुमार वाफिळकर,स्वप्नील सानप,पांडुरंग शिर्के,महादेव जाधव, शांताराम घरट, नितीन वारकर,अंबाजी जाधव,रामचंद्र कापसे,सतीश पवार,रमेश गायकवाड,यांच्यासह समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण वर्ग उपस्थित होते.
जय हनुमान मित्र मंडळ गोवे शिवजयंती उत्सवाचा पाचवा वर्षे असून या कार्यक्रमात रायगड ते गोवे मशाल ज्योत, शिवमूर्ती पूजन,पालखी सोहळा, शिवचरित्र व्याख्यान व नंतर पावनखिंड हा पडदयावरील चित्रपट अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्य,ग्रामस्थ मंडळ, व महिला मंडळ यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजदीप जाधव यांनी केले.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment