रविंद्र लोखंडे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

    कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील चिल्हे गावाचे सुपुत्र रविंद्र नारायण लोखंडे सर यांना मनुष्यबल विकास आकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर (सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक,पत्रकार,कवी व वक्ता), रमेश आव्हाड(सुप्रसिद्ध साहित्यिक)डॉ. सौ.महालक्ष्मी वानखेडकर (इंटरनॅशनल टॅलेन्ट आयकॉन)या मान्यवरांच्या सुभेहस्ते सांस्कृतिक सभागृह मुंबई येथे नुकताच देण्यात आला.

 रविंद्र लोखंडे सर यांचे शिक्षण बी.ए.भूगोल मुंबई युनिव्हर्सिटी,बी.ए.इंग्लिश यशवंतराव चव्हाण नाशिक युनिव्हर्सिटी,एम.ए.इंग्लिश टिळक युनिव्हर्सिटी पुणे, बी.एड.देवगड,सिंधुदुर्ग मुंबई युनिव्हर्सिटी पर्यंत झाले असून याबरोबर एन.सि.सि मध्ये बी आणि सि प्रमाणपत्र, खोखो जिल्हा पंच परीक्षा पास, कब्बड्डी जिल्हा पंच परीक्षा पास, स्काऊट गाईडच्या माध्यमातून श्रद्धा इंग्लिश मेडीयम स्कुल माणगाव येथील ३० विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार मिळवून दिले. जिल्हा व राज्य पातळीवर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मद्दत व यानंतर स्वतःची ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कुल काढून नावारूपाला आणली असून ती ते स्वतः चालवता तसेच त्यांनी १९ वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे यामुळे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षण गुरुगौरव शिक्षकरत्न २०२१ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रविंद्र नारायण लोखंडे सर हे कोलाड रोहा लायन्स क्लबचे सचिव ही असून सामाजिक कार्यात महत्वाची भूमिका बजावत असून या पुरस्काराबद्दल लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर सानप,महादेव आग्री, डॉ. मंगेश सानप, रविंद्र घरत,पराग फुकणे, डॉ.विनोद गांधी,गजानन बामणे, नंदू कळमकर,अलंकार खांडेकर,अनिल महाडिक, दिनकर सानप,नरेश बिरगावले,महेश तुपकर,राजेंद्र कप्पू, विजय गोतमारे,नितेश शिंदे, गणेश बागुल, कल्पेश माने, किशोर कडू सर्व सदस्य,खांब कुणबी ग्रुपचे सर्व सदस्य,शिक्षक मित्र, चिल्हे ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog