ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी,




कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब विभागातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब यांच्या वतीने शिवजयंती मोठया उत्साहात वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली,

        बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छ. शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारत वाशियांचा राष्ट्रीय उत्सव आहे आणि त्या प्रित्यर्थ १९ फेब्रुवारी रोजी या स्कूलच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते,           

बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी कोलाड खांब देवकान्हे विभागातील नामवंत शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजन्मोउत्सव सोहळा मोट्या उत्साह वातावरणात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी छ. शिरायांची मिरवणूक तसेच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचबरोबर विविध पोशाख परिधान करून विद्यार्थी वर्गानी रयतेच्या राजांबद्दल आपले विचार प्रगट करून उपस्थांची मने जिंकली ,

यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे अध्यक्ष तथा कल्याण भिवंडी परिसरातील महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे कनिष्ठ शिक्षक डॉ सागर सानप ,संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लोखंडे,उपाध्यक्ष सुधीर लोखंडे,स्थानिक कमिटी अध्यक्ष गोविंद वाटवे,रायगड भूषण तथा पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,रोहा तालुका बौद्धसमाज अध्यक्ष विलास कांबळे,लायन राजेंदर कोप्पू,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे,आदी विद्यार्थी व शिक्षक तसेच शिक्षिका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.



यावेळी लेझीम पथक व विविध कला येथील विद्यार्थ्यांनी साजरी केली तर या कार्यक्रमाची सुरुवात छ.शिवरायांची मिरवणूक तद्नंत मूर्तीची प्रतिष्ठापना दीपप्रज्वलन,शिवरायांना मांवनदना व स्वरस्वती पूजन स्वागत गीताने करण्यात आली,उपस्थित मान्यवरांचे स्वागत त्याच बरोबर उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी शिक्षक वर्गाला शिवजयंती निमित्ताने अनमोल असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु आर्या लोखंडे हिने हिने केले कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका रिया लोखंडे यांनी केले तर आभार शिक्षिका शिंदे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले,

Comments

Popular posts from this blog